सामन्यापूर्वी भारताला कल, पण पराभव झाल्याने पंटर्स कंगाल, बुकी मालामाल, अनेक ठिकाणी पोलिसांची कारवाई


विशेष प्रतिनिधी

मुंबई : सगळेच खेळाडू फॉर्ममध्ये आणि कागदावर बलाढ्य दिसणाऱ्या टीम इंडिया चा पाकिस्तानने दारुण पराभव केल्याने पंटर्स कंगाल पण बुकी मालामाल झाले. पोलिसांनी अनेक ठिकाणी कारवाई केली आहे.India before the match, but due to the defeat of the punters loose, bookie plus

पारंपरिक शत्रू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारत-पाकिस्तान क्रिकेट संघातच सलामीचा सामना होणार असल्याने बुकींनी भारताला कल दिला होता. परंतु, सहा ओव्हरमध्येच बुकीबाजार गडबडला. कोट्यवधींची उलटफेर करणारे पंटर कंगाल अन् बुकी मालामाल झाले.



भारत-पाकिस्तानच्या क्रिकेट सामन्यादरम्यान देशभरात हजारो कोटींचा सट्टा लागला होता त₹ २००७ मध्ये पाकिस्तानला नमवून टी-२० चा विश्वचषक जिंकणाऱ्या आणि पाकिस्तानचा सलग 13 वेळ पराभव करणाऱ्या भारताला बुकींनी आजच्या सामन्यातही चढे दर दिले होते.

ऑनलाइन बेटिंगचे प्लेटफॉर्म बेट ३६५ आणि लँडब्रोक्सनुसार, बुकींच्या यावेळीचा विश्वचषक विजेता भारतच असल्याने सामना सुरू होण्यापूर्वी भारताच्या बाजूने कल देत बुकींना आजच्या सामन्याचा रेट ५७, ५८ ठेवला होता. नंतर भारताच्या बाजूनेच ६०-६२ चा रेट आला. मात्र, ६ ओव्हरमध्येच बुकीबाजार गडबडला.

भारताने अवघ्या ३ धावांवर रोहित शर्माची, नंतर केएल राहुल आणि त्यानंतर सूर्यकुमार अशा तीन विकेट गमविल्यामुळे बुकींना पाकिस्तानला फेवर केले. त्यामुळे पाकिस्तानच्या बाजूने ७६-७८ असा रेट गेला. नंतर मात्र ११ ओव्हरमध्ये ६६ धावा बनवून भारताने पुन्हा बुकींना आपल्याकडे आकर्षित केले.

त्यामुळे भारतावर ८८-८९ असा दर दिला गेला. पहिली खेळी संपली तेव्हा १५१ धावा झाल्या. तरी देखील भारतच जिंकेल असा सट्टा बाजारात अंदाज होता.पण भारताचा पराभव झाला आणि बुकी मालामाल झाले.

India before the match, but due to the defeat of the punters loose, bookie plus

महत्त्वाच्या बातम्या

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात