G 20 ची अध्यक्षता भारताने स्वीकारली; शंकराचार्य मंदिरासह राष्ट्रीय स्मारकांवर रोषणाई; परिषद, बैठकांचे अनेक शहरांमध्ये विकेंद्रीकरण


वृत्तसंस्था

श्रीनगर : जगातील विकसित आणि विकसनशील देशांचा समूह G 20 ची अध्यक्षता भारताने आज अधिकृतरित्या स्वीकारली. या निमित्ताने देशभरात आज महत्त्वपूर्ण कार्यक्रम आयोजित केले. यामध्ये देशभरातील सर्व राष्ट्रीय स्मारकांवर आणि सरकारी कार्यालयांवर खास रोषणाई करून आनंद साजरा केला. त्याचबरोबर देशभरातील 75 विद्यापीठातील विद्यार्थ्यांना परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी संबोधित करून भारताच्या G 20 च्या अध्यक्षपदाचे महत्व विशद केले. श्रीनगरच्या शंकराचार्य मंदिरावर खास विद्युत रोषणाई केली. अशीच रोषणाई देशभरातील राष्ट्रीय स्मारकांवर देखील केली. India assumed the chairmanship of G 20; Illumination of National Monuments including Shankaracharya Temple

भारताने G 20 ची अध्यक्षता स्वीकारतानाच “वन अर्थ वन फॅमिली वन फ्युचर” अर्थात “एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य” असे ब्रीदवाक्य आत्मगत केले आहे. भारताची G 20 ची अध्यक्षता पुढील वर्षभर आहे. या वर्षभराच्या कालावधीत भारतात G 20 च्या राष्ट्राध्यक्षांच्या दोन शिखर परिषदांसह विविध परिषदा आणि संमेलने होणार आहेत. भारतातील सुमारे 50 शहरांमध्ये सुमारे 200 संमेलने आणि बैठकांमध्ये G 20 चे सदस्य देश सहभागी होऊन विविध 32 क्षेत्रांबद्दल विचारविनिमय करून पुढचे जागतिक धोरण आखणार आहेत.

या निमित्ताने भारताच्या राष्ट्रीय आणि सांस्कृतिक वारशाची ओळख G 20 प्रगत आणि प्रगतिशील देशांच्या प्रमुखांना उद्योग, कृषी, विज्ञान या क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींना करून देण्याची संधी भारताला मिळाली आहे. त्यामुळे भारतात फक्त एखाद दुसऱ्या शहरात G 20 च्या प्रतिनिधींना सहभागी करून घेण्यापेक्षा भारताच्या सुमारे 50 शहरे आणि वारसा स्थळे येथे नेऊन विविध संमेलने आणि बैठका आयोजित होणार आहेत. याचा आराखडा परराष्ट्र मंत्रालयाने निश्चित केला आहे. या शहरांमध्ये अर्थातच काशी, अयोध्या, महाबलीपुरम, अजंठा वेरूळ आदी वारसा स्थळे आणि वारसा शहरांचा समावेश भारताने केला आहे. G 20 सदस्य देशांच्या राजदूतांची आणि व्यापार प्रतिनिधींची पहिली बैठक अंदमान निकोबार मध्ये नुकतीच झाली. त्यावेळी सर्व देशांच्या राजदूतांनी आणि व्यापारी प्रतिनिधींनी सेल्युलर जेलमध्ये जाऊन सावरकर कोठडीत श्रद्धांजली वाहिली.

75 विद्यापीठातील विद्यार्थ्यांना परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी जे संबोधन दिले, त्यामध्ये G 20 च्या भविष्यकालीन योजनांचा त्यांनी आढावा घेतला आणि त्यात विद्यार्थ्यांच्या सहभागाविषयी चर्चा केली. भारताची अध्यक्षता हा जागतिक दर्जाचा महा इव्हेंट आहे. तो तशाच अर्थपूर्ण पद्धतीने साजरा झाला पाहिजे, असा आग्रह भारताने धरला आहे आणि त्या पद्धतीचे नियोजन केले आहे.

एरवी भारतात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदा साधारणपणे राजधानी दिल्लीतच होत असतात. पण G 20 ची अध्यक्षता भारताने स्वीकारल्यानंतर या परिषदांचे भारत आणि विकेंद्रीकरण करून महत्त्वाच्या आर्थिक शहरांबरोबरच उच्च वारसास्थळांचाही त्यामध्ये समावेश केला आहे. हे G 20 परिषदेचे वेगळे वैशिष्ट्य ठरणार आहे.

India assumed the chairmanship of G 20; Illumination of National Monuments including Shankaracharya Temple

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात