IND VS SL : देवदत्त पडीक्कल 21 व्या शतकात जन्मलेला पहिला भारतीय खेळाडू ! पदार्पणवीर देवदत्त पडिक्कलच्या नावे जमा झाला कधीही न मोडणारा ‘हा’ विक्रम


श्रीलंकेविरुद्ध कोलंबो येथे आर. प्रेमदासा स्टेडियमवर दुसऱ्या टी-20 आंतराष्ट्रीय पदार्पण करताच भारतीय संघाचा युवा पदार्पणवीर देवदत्त पडिक्क्लने इतिहास रचला आहे.


पडिक्क्लचा जन्म 7 जुलै, 2000 रोजी झाला होता आणि टीम इंडियाकडून खेळणारा तो 21 व्या शतकातील पहिला क्रिकेटपटू बनला आहे.


विशेष प्रतिनिधी

कोलंबो : आर प्रेमदासा स्टेडियमवर श्रीलंका विरुद्ध भारत संघात तीन टी२० सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना बुधवारी खेळला गेला. भारताकडून या सामन्यात तब्बल चार खेळाडूंनी पदार्पण केले. या सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या युवा फलंदाज देवदत्त पडिक्कलने एक नवा विक्रम रचला आहे. IND VS SL: Devdutt Padikkal first Indian player born in 21st century! Debutant Padikkal, a debutant, has a record that will never be broken

पडिक्कलचा विक्रम : देवदत्त पडिक्कलने एक खास विक्रम आपल्या नावे केला. पडिक्कल २१ व्या शतकात जन्मलेला पहिला भारतीय पुरुष क्रिकेटपटू ठरला. देवदत्तची जन्मतारीख ७ जुलै २००० अशी आहे. भारतासाठी खेळणारी २१ व्या शतकातील पहिली क्रिकेटपटू होण्याचा मान भारतीय महिला संघाची आक्रमक सलामीवीर शेफाली वर्मा हिच्याकडे जातो. तिचा जन्म २००४ सालातील आहे.भारताचा ८९ वा टी२० क्रिकेटपटू बनला पडिक्कल : कर्नाटकसाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये भरघोस धावा काढणाऱ्या व इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी मागील दोन हंगामात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या युवा सलामीवीर देवदत्त पडिक्कल याला श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी देण्यात आली. तो भारताचा ८९ वा टी२० क्रिकेटपटू बनला. त्याच्यासह ऋतुराज गायकवाड, चेतन सकारिया व नितीश राणा यांनी देखील टी२० पदार्पण केले.

पडिक्कलला देशांतर्गत क्रिकेट व आयपीएलमधील चांगल्या कामगिरीचे बक्षीस म्हणून पडिक्कलला श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघात निवडले गेले होते. वनडे मालिकेत त्याला संधी मिळाली नव्हती. टी२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यापूर्वी अष्टपैलू कृणाल पंड्या कोरोनाबाधित आढळल्याने व त्याच्या संपर्कात आठ खेळाडूंना क्वारंटाईन करावे लागल्याने पडिक्कलला संधी मिळाली आणि पड्डिकलने इतिहास रचला.

IND VS SL: Devdutt Padikkal first Indian player born in 21st century! Debutant Padikkal, a debutant, has a record that will never be broken

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण