LPG Price Hike : घरगुती नव्हे कमर्शिअल एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ!!; हॉटेलचे खाणे महागणार!!


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : महागाईने होरपळून निघालेल्या जनतेला आज 1 मे कामगार दिनी आणखी एक चटका बसला आहे, गॅस सिलेंडरच्या दरवाढीचा… पण तो घरगुती नव्हे, तर कमर्शिअल गॅस सिलेंडरच्या दरवाढीचा!! Increase in price of commercial LPG gas cylinder, not domestic!

आज मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी कमर्शिअल एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 104 रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे. अर्थात ही दरवाढ घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात नसून व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात करण्यात आली आहे. मागील महिन्यातही व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 268.50 रुपये वाढ करण्यात आली होती.


मोदींच्या GDP तील वाढ म्हणजे Gas, Diesel, Petrol ची दरवाढ; २३ लाख कोटी रूपये गेले कुठे? राहुल गांधींची सरकारवर टीका


शहरानुसार नव्या – जुन्या किमती

  •  दिल्ली : 19 किलोच्या LPG सिलेंडरसाठी 2355.50 रुपये मोजावे लागतील.
  •  30 एप्रिलपर्यंत 2253 रुपये इतकी एका सिलेंडरची रक्कम होती.
  •  कोलकात्यात 2351 ऐवजी 2455 रुपये, मुंबईत 2205 ऐवजी 2307 रुपये खर्च करावे लागणार आहेत.
  •  चेन्नई, तामिळनाडूमध्ये सिलेंडरच्या किमती 2406 रुपयांवरून 2508 रुपयांपर्यंत वाढल्या आहेत.

या दरवाढीचा परिणाम हॉटेल, खाद्य पदार्थाचे स्टॉल, कॅटरिंगच्या दरावर होण्याची शक्यता आहे.

घरगुती ग्राहकांना दिलासा 

गॅस कंपन्यांनी घरगुती ग्राहकांना या महिन्यात दिलासा आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कोणतीही दरवाढ करण्यात आली नाही. मुंबईत विना अनुदानीत गॅस सिलिंडरची किंमत 949.50 रुपये आहे. तर, दिल्लीत विना अनुदानीत 14.2 किलोच्या गॅस सिलिंडरचे दर 949.50 रुपये झाले आहेत. तर कोलकात्यात गॅस सिलिंडरचे दर 976 रुपये आहेत.

सीएनजी गॅसच्या दरात वाढ

पेट्रोल, डिझेल दरवाढीने आधीच सामान्यांचे कंबरडे मोडले असताना दुसरीकडे आता पुन्हा एकदा सीएनजी गॅसच्या दरात वाढ झाली आहे. महानगर गॅस लिमिटेडने प्रति किलो मागे 4 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे आता मुंबई आणि परिसरात सीएनजी गॅसच्या प्रति किलोसाठी 76 रुपये मोजावे लागणार आहेत. महानगर गॅस लिमिटेड हा मुंबई, ठाणे आणि परिसरात प्रमुख गॅस वितरक आहे. ही दरवाढ शनिवारपासून लागू झाली आहे.

Increase in price of commercial LPG gas cylinder, not domestic!

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात