लता मंगेशकर पुरस्कार : मुख्यमंत्र्यांना निमंत्रण नाही; “किती सांगू मी सांगू कुणाला, राऊत दुःखात “बुडाला”!!


महाराष्ट्रात मुंबईत लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळा उलटून आठवडा उलटून गेला असला तरी अजून “जखमा उरातल्याच्या कळा” मात्र उठतच आहेत…!! साधारण आठवडाभरापूर्वी राष्ट्रवादीच्या “उरातल्या कळा” जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांच्या ट्विटच्या रूपाने बाहेर आल्या. आता शिवसेनेच्या “उरातल्या कळा” रोखठोकच्या रुपाने बाहेर आल्या आहेत…!! दोन्हीकडे “जखमा उरातल्या” या सारख्याच आहेत…!! Lata Mangeshkar Award: CM is not invited

मंगेशकर कुटुंबीयांनी एक तर मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुरस्कार दिला आणि त्यात ना शरद पवारांना निमंत्रण ना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण… झाला लगेच महाराष्ट्राचा अपमान झाला…!! त्या “अपमानाच्या कळा” संजय राऊत यांनी रोखठोकच्या रूपाने आठवडाभरानंतर बाहेर काढल्या आहेत. पण या “जखमा उरातल्या” बाहेर काढल्या आहेत…?? की जखमांवरची खपली काढली आहे…??, हा कळीचा प्रश्न आहे…!!

मंगेशकरांच्या कुटुंबीयांनी पंतप्रधानांना पुरस्कार दिला. हा त्यांचा खासगी कार्यक्रम होता. त्यांच्या नावाने कोणाला पुरस्कार द्यायचा आणि कुणाला नाही??, हा त्या कुटुंबियांचा प्रश्न आहे. तसाच कुणाला बोलवायचे आणि कुणाला बोलवायचे नाही?? हा पण त्या कुटुंबाचाच प्रश्न आहे… पण नाही पंतप्रधान महाराष्ट्रात मुंबईत लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार स्वीकारायला येतात आणि आपल्याला हिंग लावून विचारण्यात येत नाही याचे हे दुःख आहे…!! “मुंबई म्हणजे शिवसेना”, आणि “महाराष्ट्र म्हणजे शरद पवार”, हा दर्प डोक्यात असल्यामुळे हे दुःख जास्त टोचणारे ठरत आहे…!!



 

वास्तविक एखाद्या कार्यक्रमाला कोणाला बोलावले नाही तर कोणाच्या प्रतिष्ठेला फारशी बाधा येण्याचे कारण नाही. पण कायम दुसऱ्याच्या “महाप्रतिष्ठेवर” आपली “उपप्रतिष्ठा” जपणारे महाराष्ट्रातले दोन “महानेते” आपापल्या अनुयायांच्या डोळ्यातून स्वत:च्या दुःखाचे अश्रू गाळत आहेत… इथेसुद्धा राजकीय अश्रू ढाळण्यासाठी स्वतःचे डोळे उपलब्ध नाहीत, तर ते अनुयायांची डोळे उपलब्ध आहेत… म्हणूनच रोखठोक मधून संजय राऊतांना मुख्यमंत्र्यांना निमंत्रण नसल्याचे दुःख आठवडाभराने उगाळावे लागले आहे. ते दुःख उगाळताना सुद्धा संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे पंतप्रधानांना उपदेशाचा डोस पाजला आहे. कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांना निमंत्रण का नाही?, हे विचारणे हे पंतप्रधानांचे कर्तव्य आहे, अशी तडफड राऊत यांनी रोखठोक म्हणून व्यक्त केली आहे.

संजय राऊत अर्थातच “सीनियर रोहित पवार” असल्याने त्यांचे उपदेशाचे डोस हे अधिक वर्तमानपत्री आणि कमावलेल्या भाषेत आहेत. रोहित पवार हे स्वतःच्या मतदारसंघाची दुर्दशा सोडून पंतप्रधान गृहमंत्री आंतरराष्ट्रीय नाणेनिधी चे अध्यक्ष वगैरे लोकांना उपदेशाची ट्विट करत असतात. तसेच ट्विट त्यांनी शरद पवारांना लता मंगेशकर पुरस्काराचे निमंत्रण नसल्याबद्दल केले होते. लतादीदींचे आणि पवार साहेबांचे खूप घनिष्ठ संबंध होते, हे रोहित पवारांना ट्विट मधून “सांगावे” लागले होते. खरे म्हणजे यातच मंगेशकर कुटुंबीयांच्या दृष्टीने पवारांचे “महत्त्व” नेमके किती…??, हे ध्यानात येते…!! पण शेवटी दु:ख ते दुःखच…!! त्याच्या कळा जीवाला लागल्याशिवाय थोड्याच राहणार…!!

आपल्याला महाराष्ट्रातल्या कार्यक्रमात महत्त्व नाही ही जखम पुरात घट्ट बसून रुतली की त्याचे उद्गार अथवा चित्कार निघणारच… तसेच ते रोहित पवार आणि “सीनियर रोहित पवार” संजय राऊत यांच्या रोखठोकच्या रूपाने निघाले आहेत. त्यांना त्याआधी जितेंद्र आव्हाड यांची जोड मिळाली होती. आव्हाडांनी नेहमीप्रमाणे “बौद्धिक तडफड” केली होती. महाराष्ट्रात राहून नाव कमवायचे आणि मुख्यमंत्र्यांना बोलवायचे नाही वगैरे मखलाशी त्यांनी ट्विट मधून केली होती. पण या तडफडीचा उपयोग काय झाला…?? जितेंद्र आव्हाड असोत रोहित पवार असोत किंवा संजय राऊत असोत यांनी कितीही बौद्धिक आदळआपट केली तरी त्याचा परिणाम ना मोदींवर झाला… ना मंगेशकर कुटुंबीयांवर…!!

मंगेशकर कुटुंबियांना आपल्या खासगी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींना बोलवायचे होते. त्यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार द्यायचा होता. तो कार्यक्रम त्यांनी करून घेतला. बाकीच्या आता धांदोट्या उरल्या आहेत… त्याची रडगाणी सुरू आहेत.

– राष्ट्रवादीची नटरंगी उलटी लावणी

आधी राष्ट्रवादीने नटरंगी उलटी लावणी सादर करून घेतली, “मला बोलवा ना तरी लता मंगेशकर पुरस्कारा”… आता संजय राऊतांनी किती सांगू मी सांगू कुणाला राऊत दुःखात बुडाला”, हे गीत सादर केले आहे… त्याला महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त शोधला आहे, हेच त्यातले वेगळेपण…!!

नटरंग सिनेमाने “मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की बारा”, ही लावणी गाजवली होती… त्याच धर्तीवर आधारित “मला बोलवा ना तरी, लता मंगेशकर पुरस्कारा”, अशी नवी लावणी राष्ट्रवादी काँग्रेस गाजवली…!!

लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराचा त्यांच्या कुटुंबीयांचा कार्यक्रम आणि त्याला मुख्यमंत्र्यांना आणि शरद पवारांना निमंत्रण नाही… तरीही कार्यक्रम यशस्वी. त्याला मोठी प्रसिद्धी… हे पाहून जितेंद्र आव्हाड आधी खळवले… महाराष्ट्रात राहून प्रसिद्धी कमवायची आणि मुख्यमंत्र्यांना बोलवायचे नाही हा महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेचा अपमान आहे, असे ट्विट करून त्यांनी चिडचिड केली…!!

पण त्या पलिकडे जाऊन शरद पवारांचे नातू आमदार रोहित पवार यांनी “सभ्य” भाषेत पण खोचक ट्विट केले. लतादीदींचे आणि पवार साहेबांचेही तितकेच जिव्हाळ्याचे संबंध होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पवार साहेब जर कार्यक्रमाला हजर राहिले असते तर अधिक चांगले झाले, असते असे रोहित पवार यांचे ट्विट आहे. (लतादीदींचे आणि पवार साहेबांचे उत्तम संबंध होते… हे सांगावे लागते… यातच सगळे आले.)

जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार या दोघांचा ट्विट मधून राष्ट्रवादी काँग्रेस मधील खरी अस्वस्थता आज बाहेर आली…!! महाराष्ट्रात आम्हालाही विचारा. कार्यक्रमाचे आम्हालाही निमंत्रण द्या, अशीच “मागणी” करण्याची वेळ राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आली. आपल्याला न बोलवताही कार्यक्रम यशस्वी होतो, ही त्यांची खंत आणि चिडचिडही बाहेर आली…!! खरं म्हणजे पवार साहेबांच्या प्रतिमेला त्यामुळे धक्का बसल्याची भीती त्यांना वाटली…!!

– उद्धव ठाकरेंची चतुर खेळी

वास्तविक पाहता या कार्यक्रमाला निमंत्रण नसण्याची घटना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिशय चतुराईने हाताळली. किंबहुना त्यांनी आपल्यातली राजकीय मुत्सद्देगिरी या निमित्ताने दाखवून दिली. एरवी पवारांना त्यांच्या पक्षातले नेते आणि “पवार मीडिया” “चाणक्य” म्हणत असतात. पण प्रत्यक्षातली “चाणक्यगिरी” या वेळी उद्धव ठाकरे यांनी दाखवली…!!

– फायर आजींची भेट

लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कार्यक्रमाला निमंत्रण नव्हते. मीडियाचा सगळा फोकस त्या कार्यक्रमावर होता. आपल्यावरचा लाईम लाईट हटला असता याची पक्की कल्पना आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नेमक्या त्याच वेळी शिवसेनेच्या फायर आजींना भेटण्याचा निर्णय घेतला. ते फायर आजींना त्यांच्या घरी जाऊन भेटले. लतादीदींनी विषयी चकार शब्द न काढता ते फायर आजींना भेटले. मीडियाने या भेटीला ही जोरदार प्रसिद्धी दिली. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराचे आपल्याला निमंत्रण नसण्याने शिवसेना पक्षप्रमुख म्हणून आपल्याला काही फरक पडत नाही, हेच एका भेटीत उद्धव ठाकरे यांनी आपल्या राजकीय कृतीतून दाखवून दिले…!!

– आव्हाड – रोहित पवार ट्विट

आणि नेमके हेच शरद पवारांना जमले नाही. त्यातूनच जितेंद्र आव्हाड यांची चिडचिड झाली आणि रोहित पवारांसारख्या तरुण आमदाराची तगमग आणि तडपड झाली…!! आधीच कोल्हापूरचा भव्यदिव्य कार्यक्रमाचा मीडियाने वेगळ्या प्रकारे विचका करून टाकला होता. कोल्हापूर बाहेर त्याला फारशी प्रसिद्धी देखील मिळाले नाही. मीडियाचे सगळे फुटेज शिवसेना आणि राणा कुटुंबाने खाऊन टाकले होते. त्यातच लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराच्या कार्यक्रमाचे निमंत्रण पवार साहेबांना नसण्याची भर पडली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांचा खरा तडफडाट झाला.

– नटरंगची उलटी लावणी

मंगेशकर कुटुंबियांनी आपल्याला राजकारण कळत नाही, अशी नेहमीच भूमिका घेतली आहे. ते राजकारणात नाहीत ही वस्तुस्थिती सुद्धा नाकारण्यात मतलब नाही. पण यांनी लता दीनानाथ मंगेशकर मोदींना देऊन जे साध्य केले, त्याला राजकारणात दुसरी तोड नाही…!! म्हणूनच पवारांची जी तगमग झाली, ती त्या नटरंग लावणी सारखी झाली. नटरंगची नटी “मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की बारा”, म्हणत होती…!! पवारांचे चेले, “मला बोलवा ना तरी”, ही लावणी सादर करताना दिसले…!!

Lata Mangeshkar Award: CM is not invited

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात