छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अमित शाह यांचा अभ्यास, सलग तीन-साडेतीन तास शिवकथाकारासारखे बोलतात, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला अनुभव


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मराठ्यांच्या तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासप्रेमाचा अनुभव आम्ही सर्वांनी घेतलाय. नऊ साडेनऊ वाजता अमितभाईंकडे गेलं अन् गप्पागप्पांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय निघाला की सलग तीन साडेतीन तास अमितभाई मराठ्यांच्या इतिहासावर बोलतात, असा अनुभव विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला.
Amit Shah’s study of the history of Chhatrapati Shivaji Maharaj


विशेष प्रतिनिधी

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मराठ्यांच्या तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासप्रेमाचा अनुभव आम्ही सर्वांनी घेतलाय. नऊ साडेनऊ वाजता अमितभाईंकडे गेलं अन् गप्पागप्पांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय निघाला की सलग तीन साडेतीन तास अमितभाई मराठ्यांच्या इतिहासावर बोलतात, असा अनुभव विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला.

अमित शाह यांच्या राजकीय प्रवासासंदर्भात ‘अमित शाह आणि भाजपाची वाटचाल’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच झाले. यावेळी फडणवीस यांनी अमित शाहांच्या व्यक्तीमत्वाच्या अनेक पैलूंबद्दल भाष्य केले. अमित शाह यांना मराठ्यांबद्दल आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादणारा आदर, प्रेम आणि त्यासंदभार्तील अभ्यासाबद्दलही माहिती दिली
फडणवीस म्हणाले, अमित शाह यांना मराठे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल विशेष प्रेम आहे. मराठ्यांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा चांगला अभ्यास त्यांनी केला आहे.


Amit Shah : : महाराष्ट्राची भूमी सहकार क्षेत्रात काशीएवढीच पवित्र ! अमित शाहंचे गौरवोद्गार ; सहकारासाठी मोदी सरकार २४ तास ३६५ दिवस उपलब्ध


 

मराठ्यांच्या इतिसाहाबद्दल अगदी भरभरुन बोलताना अमितभाई आपल्याला पहायला मिळतात. त्यावेळी असं वाटतं की एखादे शिवकथाकार हे इतिहास सांगतायत एवढी अमितभाईंची सांगण्याची हतोटी आहे, असे सांगून फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांच्या इतिहासावर अभ्यास करुन अमित शाहांनी गुजराती भाषेत एक पुस्तक लिहिलं आहे.

अजून हे पुस्तक प्रकाशित व्हायचे आहे. हे पुस्तक लिहिण्यासाठी लंडनपर्यंत जाऊन तिथल्या अर्काइव्हजमधून सरकारकडून सगळी विश्वासार्ह कागदपत्रे ते घेऊन आले आहेत. त्या कागदांच्या आधारावर महाराजांच्या वस्तुनिष्ठ इतिहासाचा अभ्यास त्यांनी केला आहे. आज तो सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. अमित शाह ज्या आत्मनियतेने मराठ्यांच्या इतिहासाबद्दल बोलतात ते पाहून एखादा शिवकथाकार समोर बसून इतिहास सांगतोय असे वाटू लागते. आपल्यापैकी अनेकांना माहिती नसेल, छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते वसईच्या संधीपर्यंतचा मराठ्यांचा जो सगळा इतिहास आहे याचा पूर्ण अभ्यास अमित शाह यांनी केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांच्या इतिसाहाबरोबरच अमित शाह यांना संगीत क्षेत्राबद्दलही विशेष आवड आहे असं सांगताना फडणवीस म्हणाले लता मंगेशकर यांच्या घरी झालेल्या भेटीदरम्यान अमित शाह आणि लतादिदींनी बराच वेळ गाण्यांवर गप्पा मारल्या. म्हटलं.

Amit Shah’s study of the history of Chhatrapati Shivaji Maharaj

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात