उत्तर प्रदेशात दूध का दूध, पाणी का पाणी, १७ जिल्हा परिषदांत भाजपाचे अध्यक्ष बिनविरोध


उत्तर प्रदेशातील जिल्हा परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव झाल्याचा कांगावा विरोधकांनी केला. मात्र, अध्यक्षपदाच्या निवडणुकांनी दूध का दूध आणि पाणी का पाणी झाले आहे. १७ जिल्हा परिषदांत भाजपाचे अध्यक्ष बिनविरोध निवडून आले आहेत.In Uttar Pradesh, 17 Zilla Parishads, BJP president unopposed


विशेष प्रतिनिधी

लखनऊ : उत्तर प्रदेशातील जिल्हा परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव झाल्याचा कांगावा विरोधकांनी केला. मात्र, अध्यक्षपदाच्या निवडणुकांनी दूध का दूध आणि पाणी का पाणी झाले आहे. १७ जिल्हा परिषदांत भाजपाचे अध्यक्ष बिनविरोध निवडून आले आहेत.

उत्तर प्रदेशात महिन्यापूर्वी जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या होत्या. या निवडणुकांत भाजपाला मोठा फटका बसल्याची चर्चा घडविण्यात येत होती. योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाचा पराभव झाल्याचेही म्हटले जात होते. मात्र, हा सगळा विरोधकांचा कांगावा असल्याचे उघड झाले आहे.



जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शनिवारी अंतिम मुदत होती. यामध्ये १७ ठिकाणी भाजपाच्या उमेदवाराच्या विरोधात अर्जच आलेला नाही. एका ठिकाणी समाजवादी पार्टीचा अध्यक्ष बिनविरोध निवडून आला आहे.

मेरठ, गाजियाबाद, गौतमबुद्धनगर, अमरोहा, मुरादाबाद, आगरा, इटावा, ललितपुर, झांसी, बांदा, चित्रकूट, श्रावस्ती, बलरामपुर, गोंडा, गोरखपुर, बुलंदशहर, वाराणसी व मऊ याठिकाणी भाजपाचे जिल्हा परिषद अध्यक्ष झाले आहेत. उर्वरित ५७ पैकी ४१ ठिकाणी दुरंगी तर ११ ठिकाणी तिरंगी सामना होणार आहे.

भाजपाकडून आगऱ्यातू मंजू भदौरिया, गाजियाबाद (ममता त्यागी), मुरादाबाद (डॉ. शेफाली सिंह), बुलंदशहर(डॉ. अंतुल तेवतिया), ललितपुर( कैलाश निरंजन), मऊ (मनोज राय), चित्रकूट (अशोक जाटव), गौतमबुद्ध नगर (अमित चौधरी), श्रावस्ती (दद्दन मिश्रा), गोरखपुर (साधना सिंह), बलरामपुर (आरती तिवारी), झांसी(पवन कुमार गौतम), गोंडा (घनश्याम मिश्रा), मेरठ(गौरव चौधरी), बांदा (सुनील पटेल), वाराणसी (पूनम मौर्या) आणि तथा अमरोहा येथून ललित तंवर जिला पंचायत अध्यक्ष झाले आहेत. समाजवादी पार्टीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या इटावा येथे मात्र माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे चुलत भाऊ अभिषेक यादव जिल्हा परिषद अध्यक्ष झाले आहेत.

उत्तर प्रदेशातील जिल्हा परिषद निवडणुकांत एकूण 3050 सदस्य निवडले गेले. यामध्ये समाजवादी पार्टीने आपल्याला बहुमत मिळाल्याचा दावा केला होता. मात्र, जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीने हा दावा खोटा ठरविला आहे.

In Uttar Pradesh, 17 Zilla Parishads, BJP president unopposed

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात