पंजाबमध्ये सख्खे भाऊ एकमेंकांच्या विरोधात विधानसभा निवडणुकीत

विशेष प्रतिनिधी

अमृतसर : पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दलाचा बालेकिल्ला असलेल्या मजिठा मतदारसंघात दोन भाऊच एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. दोघांनीही स्वत:च्या विजयाचा दावा केला आहे.मजिठा मतदारसंघात सुखजिंदरराजसिंग उर्फ लल्ली मजिठिया हे आम आदमी पक्षातर्फे निवडणूक लढवित असून त्यांचे धाकटे बंधू जगविंदरपालसिंग उर्फ जग्गा मजिठिया हे काँग्रेसतर्फे निवडणूक लढवित आहेत.In the Assembly elections Punjab two brothers contesting against each other

अमृतसर जिल्ह्यातील या मतदारसंघावर २००७ पासून शिरोमणी अकाली दलाचे वर्चस्व असून विद्यमान आमदार विक्रमसिंग मजिठिया हेच १५ वर्षे येथील जनतेचे नेतृत्व करत आहेत. यंदाही त्यांनी मजिठा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला होता.मात्र, काँग्रेस नेते आणि पूर्व अमृतसर मतदारसंघातील उमेदवार नवज्योतसिंग सिद्धू यांनी आव्हान दिल्यानंतर मजिठिया यांनी मजिठामधील आपला अर्ज मागे घेत पूर्व अमृतसर मतदारसंघातून अर्ज भरला आहे.

त्यामुळे या मतदारसंघातून नवा आमदार निवडून येणार हे निश्चित असल्याने इतर पक्षाच्या उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, विक्रमसिंग यांनी त्यांच्या पत्नीलाच मजिठामधून निवडणूकीसाठी उभे केले असल्याने अप्रत्यक्षपणे ते या निवडणूकीत आहेतच.

लल्ली मजिठिया यांनी गेल्याच महिन्यात काँग्रेसमधून बाहेर पडत आपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेसने त्यांच्याच धाकट्या भावाला उमेदवारी देत प्रतिशह दिला आहे. आपले थोरले बंधू गेल्या चार वर्षांपासून लोकांच्या संपर्कात नसल्याने इतके वर्ष त्यांच्यातर्फे मीच काम करत होतो, त्यामुळे जनता मलाच मतदान करणार, असा विश्वास जग्गा मजिठिया यांनी व्यक्त केला आहे.

In the Assembly elections Punjab two brothers contesting against each other

महत्त्वाच्या बातम्या