तामीळनाडूमध्ये किन्नरशक्ती, तृतियपंथीयाचा निवडणुकीत विजय


विशेष प्रतिनिधी

वेल्लोर : तमिळनाडूतील वेल्लोर जिल्ह्यातील 39 वर्षांच्या आर.गंगा या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत विजयी होणाºया राज्यातील पहिल्या तृतियपंथी महिला ठरल्या आहेत. गंगा यांनी वेल्लोर महापालिकेची द्रमुकच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यामध्ये विजय मिळाला आहे.In Tamil Nadu, Kinnarshakti, the trasgender won the election

गंगा यांना या निवडणुकीत एकूण 2,131 मते मिळाली. अवघ्या 15 मतांनी त्यांनी ही निवडणूक जिंकली आहे. महापालिका निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर गंगा यांच्या समर्थकांनी फटाके वाजवून आनंद साजरा केला. तमिळनाडूत शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 19 फेब्रुवारी रोजी निवडणुका झाल्या. यामध्ये राज्यातील 21 महापालिका, 138 नगरपालिका आणि 489 नगरपंचायतींसाठी मतदान झाले होते.



वेल्लोर येथील निवडणूक लढवणाऱ्या तीन तृतियपंथीयांपैकी गंगा एक आहेत. रंजिता आणि सबिना अशी अन्य दोघींची नावे आहेत. या दोघींना एनटीकेने तिकीट दिले होते. निवडणुकीत विजयी झालेली गंगा वेल्लोर डिस्ट्रिक्ट ऑल जेंडर पॉझिटिव्ह नेटवर्क नावाची संस्था चालवतात. ही संस्था एचआयव्ही-एड्स आणि अपंग लोकांना मदत करते. गंगा साउथ इंडियन ट्रान्सजेंडर फेडरेशनच्या राज्य सचिवही आहेत.

निवडणुकीपूर्वी गंगा यांनी सांगितले होते की, त्या वेल्लोर ओल्ड टाऊनसाठी एक योग्य सांडपाण्याची लाइन तयार करण्याचे काम करतील, जेणेकरून शहरात पाणी तुंबणार नाही. मी परिसरातील महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांची उभारणी करण्याचं काम करेन.

त्याचबरोबर युवकांसाठी उत्तम खेळाची मैदानं तयार करण्याचा माझा प्रयत्न राहील. परिसरात शुद्ध पिण्याच्या पाण्याचा अखंड पुरवठा व्हावा, यासाठी माझ्याकडे विशेष प्लॅन आहे.

In Tamil Nadu, Kinnarshakti, the trasgender won the election

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात