तामीळनाडूमध्ये स्वतंत्र मत्स्यमंत्रालय तर आसाममधील चहामजुरांना चहा मंत्रालयाचे राहूल गांधी यांचे आश्वासन


तामीळनाडूमध्ये मच्छिमारांसाठी स्वतंत्र मत्स्यमंत्रालयाचे आश्वासन देऊन टीका ओढवून घेतलेल्या राहूल गांधी यांनी आता आसाममधील चहामजुरांसाठी स्वतंत्र चहा मंत्रालयाचे आश्वासन दिले आहे.Rahul Gandhi assures independent fisheries ministry in Tamil Nadu and tea ministry in Assam


विशेष प्रतिनिधी

गुवाहाटी : तामीळनाडूमध्ये मच्छिमारांसाठी स्वतंत्र मत्स्यमंत्रालयाचे आश्वासन देऊन टीका ओढवून घेतलेल्या राहूल गांधी यांनी आता आसाममधील चहामजुरांसाठी स्वतंत्र चहा मंत्रालयाचे आश्वासन दिले आहे.

राहूल गांधी यांनी तामीळनाडू आणि केरळच्या प्रचार सभांत मच्छिमारांसाठी स्वतंत्र मत्स्यमंत्रालयाचे आश्वासन दिले होते. मात्र, हे मंत्रालय पूर्वीपासूनच अस्तित्वात असल्याने राहूल गांधी यांच्यावर टीका झाली होती. आता त्यांनी स्वतंत्र चहा मंत्रालयाचे आश्वासन दिले आहे.आसाममधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चहाच्या मळ्यात काम करणाºयांना लुभावण्यासाठी कॉँग्रेसकडून प्रयत्न सुरू आहेत. नुकच्या कॉँग्रेसच्या सरचिटणिस आणि राहूल यांच्या भगिनी प्रियंका गांधी यांनी चहाची तोडणी केल्याचे फोटो शेअर करण्यात आले होते.

मात्र, तोडणीचा हंगाम नसताना केवळ शुटींगसाठी हे केल्याचा आरोप करण्यात आला होता. आता राहूल गांधी यांनी त्याच्या पुढे जात चहा मंत्रालयाचे आश्वासन दिले आहे.

आमचा जाहीरनामा हा बंद दाराआड नाही तर अगदी चहा मजुरांशीही चर्चा करून तयार करण्यात आला आहे. खोटे बोलायला मी नरेंद्र मोदी नाही असेही राहूल गांधी यांनी म्हटले आहे.

Rahul Gandhi assures independent fisheries ministry in Tamil Nadu and tea ministry in Assam

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था