या वर्षाच्या अखेरीस 5G रोलआउट स्पीडमध्ये भारत सर्वात आघाडीवर असणार एरिक्सन ग्लोबलच्या सीईओचं विधान
5G rollout in india: एरिक्सन ग्लोबलच्या सीईओच्या मते भारत या वर्षाच्या अखेरीस 5G रोलआउट स्पीडमध्ये सर्वात आघाडीवर असेल. तर सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीत, भारताने देशभरातील ४३३ जिल्ह्यांमध्ये १ लाखांहून अधिक 5G टेलिकॉम साइट्स स्थापित केल्या आहेत, अशी माहिती माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली आहे. In less than 6 months India has installed more than 1 Lakh 5G telecom sites covering 433 districts
आपल्या सर्वांना माहित आहे की 5G ची सुरुवात करणारा भारत हा पहिला नव्हता. भारताने हे काहीसे हळूहळू केले असले तरीही, मोदी सरकारच्या नेतृत्वात भारताचा वेगवान 5G विकास प्रशंसनीय आहे. CNMO एरिक्सन ग्लोबलचे सीईओ बोर्जे एकहोल्म यांच्या मते, 2023 च्या अखेरीस भारत 5G प्रसार करण्यात आघाडीवर असेल. त्यांनी हे देखील स्पष्ट केले की त्यांचा अर्थ 5G प्रसाराचा वेग होता लवकर लॉन्च करण्याबाबत नाही.
Election Commission of India : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून EVM बाबत जनजागृती सुरू
एकहोल्म यांनी एका मुलाखतीत भारताच्या 5G रोलआउट स्पीडची प्रशंसा केली. भारतात मोठ्या प्रमाणात टॉप सॉफ्टवेअर इंजिनीअर असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. भारत ही त्यांच्यासाठी मोठी बाजारपेठ आहे. ते म्हणाले की आम्ही भारतात आधीच २५ हजार लोकांना रोजगार देत आहोत आणि आम्ही आमचे संशोधन आणि विकास सॉफ्टवेअर आणि इतर उपक्रम पुढे नेण्याची योजना आखत आहोत.
In less than 6 months, India has installed 1 Lakh+ 5G telecom sites covering 433 districts. pic.twitter.com/TkJallVPhM — Ashwini Vaishnaw (मोदी का परिवार) (@AshwiniVaishnaw) March 17, 2023
In less than 6 months, India has installed 1 Lakh+ 5G telecom sites covering 433 districts. pic.twitter.com/TkJallVPhM
— Ashwini Vaishnaw (मोदी का परिवार) (@AshwiniVaishnaw) March 17, 2023
भारत देश हा सध्या अनेक प्रोजेक्टवर काम करत आहेत. तसेच देशभरात सध्या अनेक टेलिकॉम कंपन्यांनी आपली ५ जी सर्व्हिस सुरु केली आहे. देशाच्या अनेक शहरांमध्ये ५जी नेटवर्क सुरु झाले आहे. सध्या नेटवर्क स्पीड टेस्ट साईट असणाऱ्या Ookla च्या नुकत्याच समोर आलेल्या रिपोर्टमध्ये भारतात ५ जी सर्व्हिस अत्यंत वेगाने पसरत असल्याचे समोर आले आहे. स्पीड टेस्ट ग्लोबल इंडेक्समध्ये भारताची स्थिती मजबूत होताना दिसत आहे.
जानेवारी २०२३ मध्ये भारत हा ६९ व्या स्थानावर होता परंतु भारतात ५जी च्या वेगामुळे भारत ४९ व्या स्थानावर पोहोचला आहे. या आकडेवारीवरून भारत आता रशिया आणि अर्जेटिना सारख्या G20 राष्ट्रांच्याही पुढे गेला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App