Election Commission of India : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून EVM बाबत जनजागृती सुरू

CEC EVM

मुख्य निवडणूक आयुक्तांची क्लिप  केली जात आहे सोशल मीडियावर शेअर

प्रतिनिधी

कर्नाटकात पुढील महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. निवडणूक आयोग त्याची तयारी करत आहे. गेल्या आठवड्यात निवडणूक आयोगाचे तीन सदस्यीय पथक कर्नाटकच्या दौऱ्यावर होते. यादरम्यान या पथकाने राजकीय पक्षांच्या नेत्यांचीही भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. Election Commission has started creating awareness about EVMs

इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्समध्ये (ईव्हीएम) छेडछाड केली जाऊ शकत नाही, याचा पुनरुच्चार करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोग सोशल मीडियाचा वापर करत आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी गेल्या आठवड्यात बंगळुरू येथे पत्रकार परिषदेत या संदर्भातील विविध प्रश्नांची उत्तरे दिल्याच्या छोट्या क्लिपही निवडणूक आयोग ट्विट करत आहे.


रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याविरोधात इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टाने जारी केले अटक वॉरंट!


कर्नाटक निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, कर्नाटक विधानसभेचा कार्यकाळ २४ मे  रोजी संपत आहे आणि त्यापूर्वी निवडणुका होणार आहेत. त्याचबरोबर यावेळी ८० वर्षांवरील मतदारांना निवडणूक आयोग विशेष सुविधा देणार आहे. “आम्ही प्रथमच कर्नाटकातील सर्व ८० पेक्षा जास्त वय असलेल्यांना आणि दिव्यांग मतदारांना सुविधा देणार आहोत. त्यांना हवे असल्यास ते घरूनही मतदान करू शकतात. घरबसल्या मतदान करू इच्छिणाऱ्या कोणत्याही ८० पेक्षा जास्त किंवा PWD मतदारांच्या सोयीसाठी एक फॉर्म 12D आहे जो अधिसूचनेच्या ५ दिवसांच्या आत उपलब्ध होईल.”

कर्नाटकात भाजपचे सरकार आहे आणि बसवराज बोम्मई राज्याचे मुख्यमंत्री आहेत. तर निवडणूक आयोगासोबतच्या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुका सर्व २२४ मतदारसंघात एकाच टप्प्यात घेण्याची मागणी करत, कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटी (KPCC) ने राज्यात आदर्श आचारसंहिता त्वरित लागू करण्याचे आवाहन केले. काँग्रेसने असा युक्तिवाद केला की हे स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक आहे.

Election Commission has started creating awareness about EVMs

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”