भारतीय जनता पक्ष किमान ३५ ते ४० जागा जिंकणार असल्याचा दावा मेट्रोमॅन आणि भारतीय जनता पक्षाचे नेते ई. श्रीधरन यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे केरळमध्ये त्रिशंकू विधानसभा येणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. पलक्कड मतदारसंघात आपण दहा हजारांहून अधिक मतांनी निवडून येणार असल्याचा विश्वास श्रीधरन यांनी व्यक्त केला आहे.In Kerala, BJP has won at least 35 to 40 seats, predict hung assembly. Sreedharan claims
विशेष प्रतिनिधी
तिरुअंतपूरम : भारतीय जनता पक्ष किमान ३५ ते ४० जागा जिंकणार असल्याचा दावा मेट्रोमॅन आणि भारतीय जनता पक्षाचे नेते ई. श्रीधरन यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे केरळमध्ये त्रिशंकू विधानसभा येणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
पलक्कड मतदारसंघात आपण दहा हजारांहून अधिक मतांनी निवडून येणार असल्याचा विश्वास श्रीधरन यांनी व्यक्त केला आहे.केरळमध्ये मतदान झाल्यानंतर दुसºया दिवशी बोलताना श्रीधरन म्हणाले, टाईम्स एक्झिट पोलच्या निष्कर्षानुसार केरळमध्ये त्रिशंकू विधानसभा येणार आहे.
मी पूर्वी ४० ते ७५ जागांवर भाजपाचा विजय होईल असे म्हटले होते. परंतु, आता माझा अंदाज ३५ ते ४० जागा जिंकण्याचा आहे. त्रिशंकू विधानसभेत काहीही घडू शकते असे म्हणत आगामी राजकारणाचे संकेतही त्यांनी दिले आहेत. केरळमध्ये विधानसभेच्या १४० जागा आहेत.
भारतीय जनता पक्ष कोणत्याही आघाडीला पाठिंबा देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.कोकण रेल्वे, दिल्ली मेट्रो यासारख्या प्रकल्पांचे निर्माते म्हणून ओळख असलेले श्रीधरन यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता.
८८ वर्षीय श्रीधरन हे केरळमधील सर्वात ज्येष्ठ उमेदवार आहेत. पलक्कड मतदारसंघातून ते निवडणूक लढवित आहेत. या जागेवर गेल्या निवडणुकांत भाजपाने दुसºया क्रमांकाची मते घेतली होती.श्रीधरन म्हणाले, माझी मेट्रोमॅन ही प्रतिमा लोकांना भावली आहे.
माझ्यावर लोक इतके प्रेम करतात हे मला माहितच नव्हते. त्यामुळे दहा ते पंधरा हजार मतांनी आपण पलक्कड मतदारसंघातून निवडून येऊ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
इतर बातम्या वाचा…
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App