कर्मचाऱ्यांबरोबर वादावादीतून प्रवाशाने विमानातच उतरविले सगळे कपडे, नग्न होऊन केला तमाशा


विमानप्रवासात कर्मचाऱ्यांशी वाद झाल्याने एका प्रवाशाने विमानातच आपले सगळे कपडे उतरविले. नग्न होऊन तमशाा केला. कर्मचाऱ्यांनी सहप्रवाशांच्या मदतीने त्याला पकडले आणि पोलीसांच्या ताब्यात दिले.After arguing with the staff, unruly passenger strips naked


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : विमानप्रवासात कर्मचाऱ्यांशी वाद झाल्याने एका प्रवाशाने विमानातच आपले सगळे कपडे उतरविले. नग्न होऊन तमशाा केला. कर्मचाऱ्यांनी सहप्रवाशांच्या मदतीने त्याला पकडले आणि पोलीसांच्या ताब्यात दिले.

बंगळुरू ते दिल्ली विमानात हा प्रकार घडला. याबाबत सहप्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार एक बेशिस्त प्रवासी कर्मचाऱ्यांशी लाईफ जॅकेटवरून वाद घालत होता. त्याने कर्मचाऱ्यांशी दुर्व्यवहारही केल. त्यानंतर अचानक आपले सगळे कपडे उतरविण्यास सुरूवात केली.एअर अशिया इंडियाच्या प्रवक्त्यानेही या घटनेची पृष्टी करत म्हटले आहे की या प्रवाशाने कर्मचाऱ्यांसोबत धक्काबुक्की केली. त्याला सातत्याने समजावून सांगितले जात होते. कर्मचारी विनवणी करत होते. परंत तो ऐकत नव्हता.

त्याने आपले सगळे कपडेच उतरविले. त्यानंतर कर्मचारी आणि सहप्रवाशांनी त्याला कसेबसे नियंत्रणात आणले. वैमानिकाला याची माहिती दिल्यावर त्याने नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. विमान पुन्हा दिल्ली विमानतळावर उतरविले. तेथे पोलीसांनी या प्रवाशाला ताब्यात घेतले.

After arguing with the staff, unruly passenger strips naked

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण