हिमाचलात काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदाची संगीत खुर्ची जोरात; केंद्रीय पक्ष निरीक्षक म्हणतात, इथे वाद नाही


वृत्तसंस्था

शिमला : हिमाचल प्रदेशात काँग्रेस स्पष्ट बहुमत मिळवून सत्तेवर आली असली तरी तिथे काँग्रेस अंतर्गत मुख्यमंत्रीपदासाठी सत्ता स्पर्धा जोरात आहे. पण पक्षाचे केंद्रीय निरीक्षक मात्र इथे कोणताही वाद नसल्याचा दावा करत आहेत. In Himachal, the chair for the post of Chief Minister is loud in the Congress

हिमाचलमध्ये विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 40 जागांचे स्पष्ट बहुमत मिळवले आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये एकापाठोपाठ एक अशी 6 नावे पुढे आली आहेत. यामध्ये अर्थातच सर्वात आघाडीवरचे नाव माजी मुख्यमंत्री कै. वीरभद्र सिंह यांच्या पत्नी प्रतिभा सिंह यांचे आहे. वीरभद्र सिंह यांची विरासत काँग्रेस पक्षाने विसरू नये, असा इशारा प्रतिभा सिंह आणि त्यांचे पुत्र विक्रमादित्य सिंह यांनी दिला आहे. तर काँग्रेसच्या प्रचार समिति अध्यक्ष सुखविंदर सुक्खू हे देखील फ्रंट रनर मानले जात आहेत. या खेरीज मुकेश अग्निहोत्री, राजेंद्र राणा ठाकुर, चंद्र कुमार आणि धनीराम शांडिल्य हे नेते मुख्यमंत्रीपदाच्या रेस मध्ये आले आहेत. त्यामुळे काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदाची सत्ता स्पर्धा तीव्र झाली आहे. प्रियांका गांधी यांनी सर्व आमदारांची तपशीलवार माहिती मागवली आहे काँग्रेसचे प्रभारी राजीव शुक्ला छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंह हुड्डा हे पक्ष निरीक्षक म्हणून शिमल्यात आहेत.



प्रतिभा सिंह या फ्रंट रनन मानल्या जातात. त्या पक्षात पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष आहेतच. शिवाय वीरभद्र सिंह यांच्या पत्नी म्हणून संपूर्ण प्रदेशावर त्यांचा प्रभाव आहे. त्या उलट सुखविंदर सिंग सुक्खू हे हायकमांडच्या जवळचे मानले जातात. ते काँग्रेसचे सर्वात जास्त काळ राहिलेले प्रदेशाध्यक्ष आहेत. काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख होते.

याखेरीस बाकीचे नेतेही आपापल्या मतदारसंघांमध्ये आणि आसपासच्या मतदारसंघांवर प्रभाव टाकून आहेत. एकूण हिमाचल प्रदेशातील मुख्यमंत्री पदाची सुरस तीव्र आहे. पण पक्षाचे निरीक्षक मात्र काँग्रेसमध्ये कोणतीही सत्ता स्पर्धा नसल्याचे सांगतात.

अर्थात काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदावरून एक मत झाले नाही तर ऑपरेशन लोटस अजूनही तिथे घडू शकते. किंबहुना वीरभद्र सिंह यांचा परिवार आंध्र प्रदेश पॅटर्न राबवून जगन मोहन रेड्डीं सारखी बंडखोरी करू शकतो, असा राजकीय निरीक्षकांचा होरा आहे.

शिवाय काँग्रेस मधली सत्ता स्पर्धा ही फक्त मुख्यमंत्रीपदापूर्ती मर्यादित नसून नंतरची मंत्रिपदांचे वाटप या विषयावरही तेवढीच चुरस आहे. जास्तीत जास्त आमदारांना मंत्रिमंडळ सामावून घेणे त्यांना हवी असलेली खाते वाटप करणे ही बाब नव्या मुख्यमंत्र्यांसाठी राजकीय डोकेदुखी ठरणारी असल्याचे राजकीय निरीक्षक मानतात.

In Himachal, the chair for the post of Chief Minister is loud in the Congress

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात