Gujrat Elections Result 2022 : गुजरातेत 2017 मध्ये डिस्टिंक्शन मिळवणारी काँग्रेस 2022 मध्ये काठावर पास व्हायला धडपडतीये


विशेष प्रतिनिधी

अहमदाबाद : गुजरात मध्ये अरविंद केजरीवाल्यांचे लिख लो चॅलेंज फेल होताना दिसत आहे, तर भाजपचे नरेंद्र का रेकॉर्ड भूपेंद्र तोडेगा हा नारा यशस्वी होताना दिसतो आहे. पण या सगळ्यात काँग्रेस मात्र अक्षरशः गटांगळ्या खाताना दिसत आहे. Gujrat Elections result 2022 : Congress got distinction of winning 77 seats in 2017, but failing in getting 35 seats in 2022

हिमाचलमध्ये संघटनेच्या बळावर सत्तेवर येणारी अथवा सत्तेच्या अतिशय निकट पोहोचू शकणारी काँग्रेस गुजरात मध्ये मात्र एवढी गलितगात्र का झाली आहे?, हा चिंता आणि चिंतनाचा विषय झाला आहे.

किंबहुना आकडेवारीच्या हिशेबात बोलायचे झाले, तर 2017 मध्ये डिस्टिंक्शन मध्ये येणारी काँग्रेस 2022 च्या निवडणुकीत मात्र काठावर पास होण्यासाठी धडपडते आहे, हे पक्षासाठी विदारक चित्र आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी भारत जोडो यात्रेत मग्न राहिल्यामुळे ते गुजरात मध्ये फिरकले देखील नाहीत.

त्यामुळे त्यांचा पॉझिटिव्ह अथवा निगेटिव्ह असा कोणताही इम्पॅक्ट गुजरातच्या निवडणुकीत झालाच नाही. त्यामुळे जी निवडणूक झाली ती संघटनेच्या बळावर झाली. मग हिमाचल प्रदेशात संघटनेचे बळ यशस्वी होते, तर गुजरात मध्ये कोणती अडचणी येते?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.2017 च्या निवडणुकीत काँग्रेसला 41 % पेक्षा जास्त मते होती आणि पक्षाने 77 जागा जिंकल्या होत्या. याचा अर्थ काँग्रेस डिस्टिंक्शन मध्ये पास झाली होती. पण 2022 येता येता संघटनात्मक पातळीवर देखील काँग्रेस घसरली आणि त्याचेच परिणाम या निवडणुकीत दिसत आहेत. काँग्रेस आता काठावर पास होताना सुद्धा धडपडते आहे.

सकाळी 9.30 पर्यंतचा कलांचा अंदाज घेतल्यावर काँग्रेसचे आता 38 ते 41 जागांवर आघाडीवर असल्याचे सांगण्यात येते. 2017 मध्ये 77 जागांवर विजयी झालेली काँग्रेस जर अशी 35 ते 40 च्या रेंजमध्ये अडखळत असेल तर याला काठावर पास यापेक्षा दुसरी संज्ञा देता येत नाही. याचा अर्थ काँग्रेस संघटनात्मक पातळीवर होमवर्क मध्ये कमी पडली आणि प्रत्यक्ष परीक्षेच्या दिवसांमध्ये देखील नीट अभ्यास केला नाही हेच म्हणावे लागेल.

Gujrat Elections result 2022 : Congress got distinction of winning 77 seats in 2017, but failing in getting 35 seats in 2022

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण