Gujrat Congress : राहुल गांधींच्या दाहोद दौर्‍यात हार्दिक पटेलची नाराजी दूर!!


वृत्तसंस्था

दाहोद : गुजरात काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी आज गुजरातचा दौरा केला. दाहोद मध्ये त्यांनी आदिवासी संमेलनात भाग घेतला. केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार प्रहार केले. Hardik Patel’s displeasure removed during Rahul Gandhi’s Dahod tour

पण या दौऱ्यामध्ये सर्वाधिक चर्चा रंगली, ती प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि तरूण नेते हार्दिक पटेल यांची. हार्दिक पटेल मध्यंतरीच्या काळात गुजरात प्रदेश काँग्रेस नेतृत्वावर प्रचंड नाराज होते. त्यांनी आपली नाराजी काँग्रेस हायकमांडच्या कानावर घातली होतीच, पण प्रसार माध्यमांमध्ये उघडपणे ते प्रदेश नेतृत्वाविरुद्ध बोलले देखील होते.

या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्या दौऱ्यात हार्दिक पटेल हजर राहणार की नाही याविषयी चर्चा होती. परंतु हार्दिक पटेल यांनी स्वतःहून पुढे येत काँग्रेस हायकमांड जर गुजरात मध्ये येत असेल तर आपण त्यांच्या दौऱ्यात सहभागी होणारच, असे स्पष्ट करून दाहोदच्या रॅलीमध्ये त्यांनी भाषणही केले. काँग्रेसनेच गुजरात राज्याला पहिला आदिवासी मुख्यमंत्री दिला आहे. हे राजकीय धैर्य काँग्रेस हायकमांडने दाखवले होते, अशी स्तुतिसुमने हार्दिक पटेल यांनी हायकमांड वर उधळली आहेत.

प्रदेश काँग्रेस नेतृत्वासंदर्भात आपण केलेल्या तक्रारीची दखल हायकमांड जरूर घेईल आणि लवकरच आपल्याला उत्तर देईल, असे हार्दिक पटेल यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले. हार्दिक पटेल काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल होणार अशा बातम्या मध्यंतरीच्या काळात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर राहुल गांधींच्या दौऱ्यामध्ये हजेरी लावून हार्दिक पटेल यांनी आपली निष्ठा काँग्रेस हायकमांड अशी पक्की असल्याचे दाखवून दिले आहे. आता हार्दिक पटेल यांच्या मागणीकडे काँग्रेस हायकमांड कशा पद्धतीने पाहते आणि त्यांना कसा प्रतिसाद देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे..

Hardik Patel’s displeasure removed during Rahul Gandhi’s Dahod tour

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”