हिमाचलचे निकाल लागण्याआधीच काँग्रेसमधून 30 नेत्यांची हकालपट्टी; नेमका अर्थ काय??


वृत्तसंस्था

सिमला : गुजरात आणि हिमाचल प्रदेश या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल आज गुरुवार, ८  डिसेंबर रोजी लागत आहे. पण त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे बुधवारी, ६ डिसेंबर रोजी काँग्रेसने हिमाचल काँग्रेसमधील ३० नेत्यांची हकालपट्टी केली आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. Expulsion of 30 leaders from Congress before Himachal results

काँग्रेसने इतका मोठा निर्णय घेण्यामागे काही महत्त्वाची कारणे असल्याची चर्चा आहे. यापैकी पक्षाविरोधात काम करणे हे महत्वाचे कारण आहे. पण त्याच वेळी पक्षाला पराभवाची खात्री पटल्यानेच काही नेत्यांना काँग्रेस हायकमांडने शिक्षा केल्याची देखील अंतर्गत वर्तुळात चर्चा आहे.



हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने मोठा निर्णय घेतल्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. हिमाचल प्रदेशच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी पक्षाच्या 30 नेत्यांची हकालपट्टी केल्याने खळबळ उडाली आहे.

सर्व 30 नेत्यांची पुढच्या 6 वर्षांसाठी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्व रद्द करून हकालपट्टी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गुरुवारी, ८ डिसेंबर रोजी हिमाचल विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असताना आदल्या दिवशी काँग्रेसने याच राज्यातील ३० नेत्यांची हकालपट्टी करणे यावरून काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत जोरदार फटका बसणार असल्याची चर्चा आहे. त्याचीच शिक्षा या 30 नेत्यांना दिल्याचे मानले जात आहे. पण त्याचवेळी या सर्व नेत्यांचे कारनामे आधीच माहिती होते, तर त्यांना इतके दिवस तरी काँग्रेस मध्ये का ठेवले?, असा प्रश्न काही नेते दबक्या आवाजात विचारत आहेत.

Expulsion of 30 leaders from Congress before Himachal results

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात