हिमाचल प्रदेशात काँग्रेसला स्पष्ट बहुमत पण आमदार फुटीची वरिष्ठ नेत्यांनाच धास्ती


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : गुजरात मध्ये भाजपच्या प्रचंड विजयाची संपूर्ण देशभरात चर्चा असली तरी हिमाचल प्रदेशात मात्र काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. अवघ्या 1% मतांच्या फरकाने काँग्रेसच्या जागा भाजप पेक्षा 11 ने वाढल्या आहेत. तेथे काँग्रेसचे सरकार स्थापन होणार आहे. परंतु तरीदेखील काँग्रेसचे नेते पक्षाचे आमदार फुटण्याच्या धास्तीने त्या आमदारांना छत्तीसगडची राजधानी रायपूरला हलविण्याच्या बेतात आहेत. काँग्रेस नेत्यांनाच आपल्या आमदारांविषयी खात्री दिसत नाही.  Congress has a clear majority in Himachal Pradesh but senior leaders are afraid of MLA split

या संदर्भात छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी भाजपवर काँग्रेस आमदारांच्या संभाव्य फुटीचे खापर फोडले आहे गेल्या 8 – 10 वर्षातले भाजपचे राजकारण पाहिले तर हिमाचल प्रदेशात ते हॉर्स ट्रेडिंग करण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे वक्तव्य भूपेश बघेल यांनी केले आहे. पण ज्या पक्षाने उमेदवारांना चिन्ह दिले, प्रत्यक्ष उमेदवारी देऊन निवडून आणले त्याच काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना आपल्या आमदारांविषयी खात्री नाही असेच त्यांच्या वक्तव्यातून सूचित झाल्याचे मात्र ते विसरले.

हिमाचल प्रदेशात काँग्रेसला 39 जागा मिळाल्या आहेत. भाजपला 28 जागा मिळाल्या आहेत. तिथे 35 चे बहुमत आहे म्हणजे काँग्रेसला बहुमतापेक्षा 4 जागा अधिक आहेत. असे असतानाही भूपेश बघेल यांच्यासारख्या मुख्यमंत्र्यांना काँग्रेसचे आमदार फुटण्याची भीती वाटणे यात भाजपवरच्या संशयापेक्षा काँग्रेस आमदारांवरचा अविश्वास अधिक दिसतो आहे.

या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत पक्षाला 42% मते मिळून आणि 39 जागांचे स्पष्ट बहुमत मिळून काँग्रेसचे सरकार स्थापनेत किती आत्मविश्वासाने पुढे जाते हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Congress has a clear majority in Himachal Pradesh but senior leaders are afraid of MLA split

महत्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात