दिलासादायक, कोरोनाच्या महामारीतही प्रत्यक्ष कर संकलनात दुपटीने वाढ, २०२१-२०२२ वर्षांत तब्बल १ कोटी ८५ लाख ८७१ कोटी रुपये कर गोळा


कोरोनाच्या महामारीमुळे देशात मंदीचे वातावरण असतानाही २०२१-२२ या आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कर संकलनात गेल्या वर्षीपेक्षा १०० टक्के म्हणजे दुपटीने वाढ झालीआहे. गेल्या वर्षी ९२ हजार ७६२ कोटी रुपये कर संकलन झाले होते. या आर्थिक वर्षात त्यात दुपटीने वाढ होऊन १ लाख ८५ हजार ८७१ कोटी रुपये झाले आहे.In Corona epidemic also doubles direct tax collection, collects Rs 1 crore 85 lakh 871 crore in 2021-2022


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोनाच्या महामारीमुळे देशात मंदीचे वातावरण असतानाही २०२१-२२ या आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कर संकलनात गेल्या वर्षीपेक्षा १०० टक्के म्हणजे दुपटीने वाढ झालीआहे. गेल्या वर्षी ९२ हजार ७६२ कोटी रुपये कर संकलन झाले होते.

या आर्थिक वर्षात त्यात दुपटीने वाढ होऊन १ लाख ८५ हजार ८७१ कोटी रुपये झाले आहे.कॉर्पोरेशन टॅक्स म्हणजे उद्योगांवरील कर ७४, ३५६ कोटी रुपये आहे तर व्यक्तीगत आय कर (पर्सनल इनकम टॅक्स) १ लाख ११ हचार ४३ कोटी रुपये झाला आहे.



विशेष म्हणजे या आर्थिक वर्षात एकूण कर २ लाख १६ हजार ६०२ कोटी रुपये इतका गोळा झाला. त्यामध्ये रिफंड देऊन प्रत्यक्षात १ कोटी ८५ लाख ८७१ कोटी रुपये कर जमा झाला आहे.

गेल्या आर्थिक वर्षात भारतामध्ये कोरोनाचा उद्रेक झाला होता. मात्र, तरीही देशाचे अर्थचक्र चालू राहिले. सरकारने दिलेल्या सुमारे २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजमुळे उद्योग आणि त्यामुळे कर्मचाºयांच्या उत्पन्नातही वाढ झाली. त्यामुळे यंदाच्या वर्षी प्रत्यक्ष कर संकलन दुपटीने वाढले आहे.

In Corona epidemic also doubles direct tax collection, collects Rs 1 crore 85 lakh 871 crore in 2021-2022

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात