गाझियाबाद प्रकरण : एसएसपी म्हणाले- घटनेत धार्मिक अँगल नाही, इतर आरोपींचा शोध सुरू

ghaziabad ssp says no angle of religious incident found in investigation of viral video

Ghaziabad :  उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील लोणी भागात एका वृद्ध व्यक्तीवर हल्ला केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडिओबद्दल विविध दावेही केले गेले. या संपूर्ण प्रकरणावर गाझियाबादचे एसएसपी अमित कुमार पाठक यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एसएसपी म्हणाले की, तपासणीत कोणताही धार्मिक अँगल सापडला नाही. तावीजवरील नाराजीमुळे ही मारहाणीची घटना घडली. ghaziabad ssp says no angle of religious incident found in investigation of viral video


वृत्तसंस्था

गाझियाबाद : उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील लोणी भागात एका वृद्ध व्यक्तीवर हल्ला केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडिओबद्दल विविध दावेही केले गेले. या संपूर्ण प्रकरणावर गाझियाबादचे एसएसपी अमित कुमार पाठक यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एसएसपी म्हणाले की, तपासणीत कोणताही धार्मिक अँगल सापडला नाही. तावीजवरील नाराजीमुळे ही मारहाणीची घटना घडली.

ते पुढे म्हणाले की, घटनेत सामील झालेल्या तीन जणांना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

9 जणांवर गुन्हा दाखल

एसएसपी पाठक यांनी स्पष्टपणे सांगितले की, व्हायरल व्हिडिओसंदर्भात सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या पोस्ट बेजबाबदार आहेत. ते म्हणाले की, जाणीवपूर्वक वेगळा अँगल देऊन सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सात जणांव्यतिरिक्त पोलिसांनी ट्विटर आणि ट्विटर इंडियाविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे प्रकरण?

एका वृद्धाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये असा दावा करण्यात आला की, लोणीतील काही तरुणांनी वृद्ध मुस्लिम अब्दुल समद यांना जबरदस्तीने मारहाण केली आणि जय श्री रामचा घोष करण्यास भाग पाडले. याशिवाय त्यांची दाढीही कापण्यात आली. तथापि, तपासणीत व्हायरल व्हिडिओचे सत्य काही वेगळेच ठरले. या वृद्ध व्यक्तीने काही तरुणांना तावीज दिल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. तावीज कुचकामी ठरल्यामुळे चिडून त्यांना मारहाण झाली होती.

ghaziabad ssp says no angle of religious incident found in investigation of viral video

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात