विशेष प्रतिनिधी
पाटणा : विभागातील अधिकाऱ्यांच्या मनमानीला वैतागून बिहारमध्ये चक्क मंत्र्यानेच राजीनाम्याचा इशारा दिला आहे. केवळ बंगला, मोटार मिळाला म्हरजे कोणी मंत्री होत नाही असे म्हणत समाज कल्याण मंत्री मदन सहानी यांनी राजनीमा देण्याची तयारी केली आहे.In Bihar, due to the arbitrariness of the officials, the ministers were warned to resign
सहनी म्हणाले, त्यांच्या विभागातील अप्पर मुख्य सचिव अतुल प्रसाद मनमानी करत आहेत. विभागामध्ये मंत्र्यांचे कुणीही ऐकत नाही. सर्व नियम,कायद्यांच्या चिंधड्या उडवल्या जातात. समाजकल्याण विभागामध्ये अनेक वर्षांपासून अनेक अधिकारी ठाण मांडून आहेत. आणि मनमानी कारभार करत आहेत. त्यांना हटवण्याचा विषय काढला तेव्हा अप्पर मुख्य सचिवांनी ऐकण्यास नकार दिला.
सहानी म्हणाले, ही केवळ माझीच परिस्थिती नाही तर बिहारमध्ये कुठल्याही मंत्र्याचे कुठला अधिकारी ऐकत नाही. जून महिन्यामध्ये एकाच ठिकाणी तीन महिने पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होतात, हे सर्वांना माहिती आहे. आम्ही त्या सर्व अधिकाऱ्यांची यादी अप्पर मुख्य सचिवांना दाखवली.
मात्र तिच्याकडे लक्ष घालणारा कुणीही नाही आहे. दरम्यान, समाजकल्याण मंत्र्यांनी राजीनामा देण्याची भाषा करताना मी मागास जातीमधील असल्याने आम्हाला दबावात ठेवले जात आहे. आमचे म्हणणे कुणी ऐकत नाही.
जर मंत्र्याचेच कुणी ऐकत नसेल तर अशा परिस्थितीत मंत्री बनून राहण्याचा काय फायदा, याआधीही मला असेच गप्प करण्यात आले. पण ऐकणारा कुणी नाही. सहन करण्याचीही एक मयार्दा असते. आता राजीनाम्याशिवाय माझ्यासमोर दुसरा पर्याय नाही, अशा शब्दात मदन सहानी आपला संताप व्यक्त केला.
बिहारमध्ये विभागांतर्गत अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. मदन सहानी यांच्यापूर्वी भाजपाचे नेते ज्ञानेंद्र सिंह ज्ञानू यांनीही आपल्या सरकारवर आरोप केले होते. अनेक असे लोक आहेत. जे पैसे घेऊन बदल्या करतात. त्याचा तपास झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App