वृत्तसंस्था
बेळगाव : कोरोनाचे समूळ उच्चाटण व्हावे, यासाठी येथील भाजपच्या आमदाराने होमहवन केले. तसेच लोकांचे कल्याण व्हावे म्हणून शहरातील गल्ल्यांमध्ये होमहवनाचा पेटलेला गाडा फिरवला आहे. In Belgaum Bjp MLA done Yajna to destroy Coronavirus
अभय पाटील, असे आमदारांचे नाव आहे. ते दक्षिण बेळगाव मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आले आहेत. कोरोनाचे संकट दूर व्हावे, यासाठी त्यांनी हा यज्ञ केला होता.
दरम्यान, कोरोनाविरोधात सुरू असणाऱ्या लढ्यामध्ये भाजप आमदाराने होमहवन केल्यामुळे कोरोना जाईल का, अशी टीका आता होत आहे.
घोड्याचा मृत्यू, अंत्यसंस्काराला गर्दी
बेळगावातून काही दिवसांपूर्वी घोड्याच्या अंत्यसंस्कारासाठी तोबा गर्दी झाली होती. कोन्नूरच्या जवळ असलेल्या कदासिद्धेश्वर आश्रमातील हा घोडा होता. जगातील कोरोना नष्ट व्हावा म्हणून या घोड्याला सोडून देण्यात आलं.
त्यानंतर हा घोडा दोन दिवस गावामध्ये चरत होता. पण, अचानक त्याचा मृत्यू झाला आणि त्यानंतर त्याची अंत्ययात्रा पाहण्यासाठी ही हजारोंची गर्दी जमा झाली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App