भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील दुर्लक्षित पैलूवर प्रकाश; रासबिहारी बोसांचा पत्रव्यवहार आणि सावरकर

हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य संग्रामात देशाबाहेर राहून ज्यांनी अतुलनीय योगदान दिले त्यामधले एक अग्रगण्य नाव म्हणजे, रासबिहारी बोस. त्यांची आज १३५ वी जयंती. रासबिहारी हे सशस्त्रक्रांतीचे पुरस्कर्ते असल्याने त्यांचे नाव भारताच्या इतिहासातून अस्तंगत केले गेले. पण आता नवे संशोधन आणि नवे लेखन यातून भारतीय इतिहासावर नवा प्रकाश पडतो आहे. त्यातलाच एका महत्त्वाच्या पैलूवर प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न… Rash bihari bose, Netaji subhash chandra bose and Savarkar in new light of historical research


हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य संग्रामात देशाबाहेर राहुन ज्यांनी आपले अतुलनीय योगदान दिले त्यामधले एक अग्रगण्य नाव म्हणजे, रासबिहारी बोस. रासबिहारी बोस हे सशस्त्रक्रांतीचे पुरस्कर्ते असल्याने त्यांचे नाव भारताच्या इतिहासातून अस्तंगत केले गेले. मात्र, नवे संशोधन, नवे लेखन यामधून काही धागेदोरे जुळत आहेत. काही पक्के होत आहेत.

त्यापैकीच एक धागा पक्का होतोय तो म्हणजे रासबिहारी बोस आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मैत्रीचा. सावरकरांच्या राजकीय जीवनातला हा एक अत्यंत महत्त्वाचा पैलू आहे, तो सावरकर प्रेमींकडूनही फारसा उल्लेखला गेलेला नाही. सावरकरांच्या वैचारिक विरोधकांनी तर त्याकडे लक्ष देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

रासबिहारी बोस हे सावरकरांना आपले मित्र आणि मार्गदर्शक मानायचे. त्यांनी सावरकरांना जपानमधून अनेक पत्रे लिहिलीत ती आता उजेडातही आली आहेत. रासबिहारींनी पत्रे लिहिल्याचा उल्लेख स्वतः सावरकरांनी आपल्या १९५२ च्या भाषणातूनही केला आहे. यात नवीन काही नाही. शिवाय रासबिहारींनी फक्त सावरकरांनाच अशी पत्रे लिहिली नाहीत, तर भारतातल्या सर्व राष्ट्रीय नेत्यांना पत्रे लिहिली आहेत. या पत्रांमधले जे वेगळेपण आहे, ते त्यांच्या content मध्ये आणि intentions मध्ये आहे.

दुसऱ्या महायुद्धात उतरण्याची जपानची तयारी आणि भारताला असलेली संधी या विषयी रासबिहारींनी या पत्रांमध्ये विस्तृत विवेचन केलेले आहे.

महात्मा गांधी, नेहरू, जीना, मौलाना आझाद, राजगोपालाचारी या सर्व नेत्यांना लिहिलेल्या पत्रांमध्ये रासबिहारींनी सावरकरांना लिहिलेली पत्रे personal touch असलेली आढळतात. इतर नेत्यांना ते Revered असे संबोधतात तर तर सावरकरांना ते Venerable असे संबोधतात. सावरकरांना ते Senior comrade in spirit असे मानतात. सावरकारांना लिहिलेली ही पत्रे विशेष मैत्रीभावनेची प्रतिक आहेत. तर इतरांना लिहिलेली पत्रे appealing पण औपचारिक आहेत. सर्व पत्रे आता internet वर उपलब्ध आहेत त्यामुळे संशोधकांना याचे पुरावे उपलब्ध होऊ शकतात.

इतर सर्व नेत्यांना ते आपली ओळख I Rash bihari Bose, अशी करून देतात. तर सावरकरांना ते स्वतःची ओळख करून देत नाहीत. ते थेट Grettings ने सुरूवात करतात.

या सर्व पत्रांमधला मजकूर Between the lines वाचल्यानंतर एक बाब लक्षात येते, ती म्हणजे आपले राष्ट्रीय नेते ब्रिटिशांशी compromise करतील, अशी शंका रासबिहारींना येत होती. आणि ती रास्त असल्याचे नंतरचा इतिहास सांगतो. सावरकरांना वगळून इतर नेत्यांना लिहिलेल्या पत्रात रासबिहारी म्हणतात, Do not accept the gift from the British. याचा अर्थ उघड आहे, स्वातंत्र्य हे ब्रिटिशांकडून बक्षिसाच्या रूपात स्वीकारू नका. तो भारतीयांचा हक्क या स्वरूपात स्वीकारा, असा रासबिहारींचा आपल्या नेत्यांना आग्रह होता.

रासबिहारींची पत्रे आपल्या प्रत्येक नेत्याच्या मनोवृत्तीवर प्रकाश टाकतात. “ब्रिटिशांची महायुध्दातली अडचण ही भारतीयांसाठी संधी”, हे सावरकरांचे तत्त्व रासबिहारी प्रत्येक पत्रात आवर्जून नमूद करतात.

भारत Transfer of power च्या दिशेने जात असताना आपले नेते कोणत्या मनोवस्थेत होते, यावर ही पत्रे व्यवस्थित प्रकाश टाकतात. विशेषतः नेहरू – पटेलांनी १९४७ आणि नंतर दिलेल्या मुलाखती यांचा संबंध या पत्रांशी लावला, तर भारतीय स्वातंत्र्य प्रक्रियेवर चांगला प्रकाश पडतो. आणि ती समजून घेणे अधिक सोपे होते. नेहरू – पटेलांच्या मुलाखती देखील यूट्यूबर उपलब्ध आहेत.

साधारण १९४० नंतर भारतीय नेते दिवसेंदिवस compromising mode मध्ये गेल्याचे यातून दिसते. आपले सगळे नेते ब्रिटिशांपुढे झुकल्याचे दिसते. हे सर्व नेते अतिशय बुद्धिमान असूनही त्यांना Negotiating table वर ब्रिटिशांवर बाजू उलटविता आली नाही, हे स्पष्ट होते.

काही विचारवंतांनी रासबिहारींची पत्रे ही “भावनिक पत्रे” या दृष्टीने बघून सोडून दिलेले दिसते. कारण ती त्यांच्या Narrative ला सूट होत नव्हती. वस्तुस्थिती मात्र, अशी होती, की या पत्रांमध्ये भारतीय नेत्यांच्या मानसिकतेचे सहीसही प्रतिबिंब पडलेले दिसते.

या पत्रांच्या संदर्भात आपण Transfer of power च्या Negotiations कडे बघतो त्यावेळी एक वेगळा पैलू समोर येतो. अर्थात तो पाहण्याची इच्छा असेल, तर दिसू शकतो. अन्यथा त्याकडे दुर्लक्ष होते. ब्रिटिश Tough Negotiators होते. आपले सगळे नेते त्यांच्यासमोर “डोळ्याला डोळा भिडवून जशास तसे” उभे राहू शकले नाहीत, याचा एक पुरावा म्हणजे रासबिहारींची पत्रे आहेत. त्यांचे अधिक संशोधन होणे गरजेचे आहे.

Rash bihari bose, Netaji subhash chandra bose and Savarkar in new light of historical research

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात