इम्रान खान यांचे दिवस भरले, विरोधकांकडून अविश्वास ठराव, स्वकीयही बंडखोरीच्या तयारीत


विशेष प्रतिनिधी

इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे दिवस भरत आले आहेत. विरोधी पक्ष 28 मार्च रोजी संसदेत इम्रान सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्याच्या तयारीत आहेत. इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ म्हणजेच पीटीआयच्या सुमारे चोवीस खासदारांनीही बंड पुकारले आहे. इम्रान यांचे दिवस संपल्याचा दावा विरोधकांनी केला आहे.Imran Khan’s days are full, no-confidence motion from the opposition, even his own party mps rebellion

पाकिस्तानच्या राज्यघटनेच्या कलम 95 नुसार पंतप्रधानांविरुद्ध नॅशनल असेंब्लीमध्ये अविश्वासाचा प्रस्ताव मांडला जाऊ शकतो. अविश्वास प्रस्तावासाठी नॅशनल असेंब्लीच्या किमान 20 टक्के सदस्यांना संसदेच्या सचिवालयाला नोटीस द्यावी लागते. त्यानंतर या प्रस्तावावर तीन दिवस आधी किंवा सात दिवसांनंतर मतदान होऊ शकत नाही. हा ठराव नॅशनल असेंब्लीत बहुमताने मंजूर झाल्यास पंतप्रधानांना पायउतार व्हावे लागेल. सध्या नॅशनल असेंब्लीमध्ये अविश्वास प्रस्ताव मंजूर करण्यासाठी 172 मतांची गरज आहे.



पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ म्हणजेच पीएमएल-एन आणि विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ यांनी नॅशनल असेंब्लीमध्ये पीएमएल-एन आणि पीपीपीच्या 100 हून अधिक खासदारांनी स्वाक्षरी केलेली अविश्वास प्रस्तावाची सूचना सादर केली. यावेळी ते म्हणाले की, आम्ही हा निर्णय आमच्यासाठी नाही तर पाकिस्तानच्या जनतेसाठी घेतला आहे. इम्रान यांनी देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली आहे. त्यामुळे देशात महागाई आणि बेरोजगारी शिगेला पोहोचली आहे. कर्ज घेऊन 22 कोटी जनतेला गहाण ठेवले आहे.

माजी राष्ट्रपती आणि पीपीपीचे सह-अध्यक्ष आसिफ अली झरदारी म्हणाले की, सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांसह अनेक लोक सरकारच्या खराब कामगिरीवर नाराज आहेत. आम्हाला 272 हून अधिक खासदारांचा पाठिंबा असून आमची वाटचाल यशस्वी होईल.इस्लामाबादच्या रॅलीत माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचे पुत्र आणि पीपीपी नेते बिलावल भुट्टो झरदारी म्हणाले की, इम्रान यांनी राजीनामा द्यावा आणि निवडणुकीत आमचा सामना करावा अन्यथा अविश्वास प्रस्तावासाठी तयार राहावे.

इम्रान खान पाकिस्तानात आघाडी सरकारचे नेतृत्व करत आहेत. नॅशनल असेंब्लीची एकूण सदस्य संख्या 342 आहे आणि बहुमताचा आकडा 172 आहे.इम्रान यांच्या पक्षाचे एकूण 155 खासदार आहेत. म्हणजेच बहुमतापेक्षा 17 कमी आहे. पीटीआयला 6 पक्षांच्या आणखी 23 खासदारांचा पाठिंबा असून इम्रान सरकारला सध्या 178 खासदारांचा पाठिंबा आहे.

माजी पंतप्रधान नवाझ शरीफ आणि बेनझीर भुट्टो यांचा पक्ष पीएमएल-एन आणि पीपीपी यांच्या एकत्रित विरोधी पक्षातील एकूण खासदार संख्या 160 आहे. नॅशनल असेंब्लीमध्ये अविश्वास ठराव मंजूर करण्यासाठी विरोधकांना 172 मतांची गरज आहे. अशा स्थितीत इम्रान खान यांना सत्तेवरून हटवण्यासाठी विरोधकांना आणखी 12 खासदारांची गरज भासणार आहे. 21 मार्च रोजी नॅशनल असेंब्लीचे अधिवेशन बोलावले जाण्याची शक्यता असून त्यावर 28 मार्च रोजी मतदान होणे अपेक्षित आहे.

एखाद्या खासदाराने आपल्या विरोधात मतदान केले त्याचा अर्थ त्याने स्वत:ला विकले, असा आरोप इम्रान खान यांनी केला आहे. विरोधकांचे वर्णन चोरांची टोळी असे केले आहे. नवाझ शरीफ गिधाड आणि त्यांचा भाऊ शाहबाज चपराशी आणि बूट पॉलिश करणारा आहे.सरकारकडून अपहरण होईल या भीतीने इम्रान यांचे बंडखोर खासदार इस्लामाबादमधील सिंध हाऊसमध्ये थांबले आहेत. ही सिंध सरकारची मालमत्ता आहे आणि ती ढढढद्वारे चालवली जाते. पाकिस्तानच्या सिंध प्रांतातही पीपीपीचे सरकार आहे.

10 मार्च रोजी पोलिसांनी इस्लामाबादमधील खासदारांच्या अपार्टमेंटवर छापे टाकले आणि दोन विरोधी खासदारांना ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोप केला आहे की विरोधी जमियत-उलेमा-ए-इस्लाम एफचे कार्यकर्ते परवानगीशिवाय अपार्टमेंटमध्ये घुसले होते. मात्र, काही तासांतच खासदारांना सोडून देण्यात आले होते.

त्याचवेळी इम्रान खान यांच्या पक्षाचे बंडखोर खासदार राजा रियाझ म्हणाले की, सरकार महागाई नियंत्रणात अपयशी ठरत आहे. यासोबतच इम्रान यांनी पैशांसाठी आपल्यावर केलेले आरोपही राजा यांनी फेटाळून लावले. ते म्हणाले की, खासदार सिंधच्या मालमत्तेत स्वत:च्या इच्छेने राहत आहेत.पीटीआयचे आणखी एक बंडखोर खासदार नूर आलम खान म्हणाले की, सरकारने त्यांच्या अनेक तक्रारी सोडवल्या नाहीत. आमच्यासारखे दोन डझनहून अधिक बंडखोर खासदारही सरकारच्या धोरणांवर खुश नसल्याचे त्यांनी सांगितले.

इम्रान खान यांच्यासमोर काय पर्याय आहेत?इम्रान अविश्वास प्रस्तावात पराभूत झाल्यानंतर तीन प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ शकते. प्रथम, लष्कर स्वत: सूत्रे ताब्यात घेऊ शकते आणि काही दिवसांनी पुन्हा सार्वत्रिक निवडणुका घ्याव्या लागतील. दुसरी परिस्थिती अशी आहे की विरोधी पक्षांनी पंतप्रधानपदासाठी पीएमएल-एनचे नेते शाहबाज शरीफ यांची निवड करावी.

यासोबतच पीपीपीचे नेते आसिफ अली झरदारी आणि त्यांचा मुलगा बिलावल भुट्टो हेही शर्यतीत असतील. अशीही परिस्थिती असू शकते की इम्रान स्वत: राजीनामा देऊन आपल्या पक्षाच्या दुसऱ्या नेत्याला पंतप्रधान बनवतात. पाकिस्तानी लष्कराने आपल्या पक्षाच्या आणखी एका नेत्याला पंतप्रधान बनवण्यास सांगितले आहे, असे अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे.

Imran Khan’s days are full, no-confidence motion from the opposition, even his own party mps rebellion

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात