इम्रान खान यांची सुटका, सर्वोच्च न्यायालयाने अटक बेकायदेशीर ठरवली; आज इस्लामाबाद हायकोर्टात सुनावणी


वृत्तसंस्था

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे अध्यक्ष इम्रान खान यांची अटक बेकायदेशीर ठरवली असून त्यांची तत्काळ सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. इम्रान खान यांना उद्या इस्लामाबाद उच्च न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.Imran Khan Released, Supreme Court Declares Arrest Illegal; Hearing in Islamabad High Court today

खान यांच्या अटकेनंतर देशभरात हिंसाचार सुरू झाला होता. दरम्यान, देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांना आज न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले होते. सुनावणीदरम्यान न्यायालयाने अटक बेकायदेशीर ठरवत पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांची सुटका करण्याचे आदेश दिले आहेत.



कोर्टाने दिले निर्देश

पाकिस्तानचे सरन्यायाधीश उमर अता बंदियाल, न्यायमूर्ती मोहम्मद अली मजहर आणि न्यायमूर्ती अतहर मिनाल्ला यांच्या तीन सदस्यीय खंडपीठाने खान यांना न्यायालयात हजर करण्याचे निर्देश दिले. अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफच्या अध्यक्षाच्या अटकेविरोधातील याचिकेवर खंडपीठाने यापूर्वीच सुनावणी केली होती.

अटकेवर सुप्रीम कोर्ट संतप्त

खटल्याच्या सुनावणीदरम्यान 70 वर्षीय खान यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या परिसरातून अटक केल्याबद्दल खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. इम्रान खान लाहोरमधील एका प्रकरणासंदर्भात उच्च न्यायालयात पोहोचले होते. खंडपीठाने एनएबीला 4.30 वाजेपर्यंत (स्थानिक वेळेनुसार) हजर करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर न्यायालयाचे कामकाज पुन्हा सुरू झाले.

न्यायालयाने अटकेवर प्रश्न उपस्थित केले

या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश बंदियाल यांनी प्रश्न केला की, एखाद्या व्यक्तीला न्यायालयाच्या परिसरातून अटक कशी केली जाऊ शकते? रजिस्ट्रारच्या परवानगीशिवाय कुणालाही न्यायालयातून अटक करता येणार नाही, असेही न्यायालयाने या प्रकरणात म्हटले आहे. आवारात प्रवेश करणे म्हणजे आत्मसमर्पण करणे होय, असेही न्यायालयाने म्हटले आहे. आता प्रश्न असा आहे की शरणागती पत्करल्यानंतर व्यक्तीला अटक कशी होणार! एखाद्या व्यक्तीने न्यायालयात आत्मसमर्पण केले असेल तर त्यांना अटक करण्यात काय अर्थ आहे, अशी टिप्पणी सरन्यायाधीशांनी केली.

उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान

इम्रान खान यांना मंगळवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर बुधवारी त्यांना अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात 8 दिवसांसाठी एनएबीकडे सोपवण्यात आले. त्यानंतर इम्रान खानने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन त्याच्या अटकेवरील एनएबी वॉरंट रद्द करून अटक ‘बेकायदेशीर’ असल्याचे म्हटले होते.

Imran Khan Released, Supreme Court Declares Arrest Illegal; Hearing in Islamabad High Court today

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात