वृत्तसंस्था
पणजी : विरोधी पक्षांच्या ऐक्यासंदर्भात ममता बॅनर्जी आणि काँग्रेस यांचे दृष्टीकोण थोडेसे भिन्न आहेत. परंतु ते जर एक झाले तर भाजपचा पराभव शक्य आहे, असा दावा काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी चिदंबरम यांनी केला आहे.If mamata and congress approach converge, then it is better for opposition unity, says p. chidambaram
पी. चिदंबरम यांच्याकडे गोव्याच्या काँग्रेसची संघटनात्मक जबाबदारी आहे. गोव्यामध्ये या आधीच्या निवडणुकीत काँग्रेसचे 14 आमदार निवडून आले होते. त्यावेळी चिदंबरम यांना सरकार बनविण्यात अपयश आले होते.
नितीन गडकरी यांनी त्यावेळी गोव्यात मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करून दाखविले. त्यानंतर पाच वर्षे उलटली आहेत. आता काँग्रेस कडे फक्त तीन आमदार उरले आहेत. बाकी आमदार भाजपकडे वळले आहेत.
ममता बॅनर्जी यांनी देखील गोव्यात तृणमूल काँग्रेसची स्थापना करून काँग्रेसचेच नेते लुईजीनो फलेरो यांच्याकडे पक्षाची धुरा सोपविली आहे. या पार्श्वभूमीवर चिदंबरम यांनी ममता बॅनर्जी आणि काँग्रेस यांचा दृष्टिकोन एक झाला तर ताकद एकवटेल. आणि भाजपचा पराभव शक्य होईल, असा दावा केला आहे.
याबाबत त्यांनी शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याची स्तुती केली आहे. संजय राऊत यांनी योग्य भूमिका मांडली आहे. भाजपा विरोधात सर्व विरोधी पक्षांनी एकत्र आले पा
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App