आयसीसीआर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचा जगभरात वाजणार डंका!!


प्रतिनिधी

नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद अर्थात आयसीसीआर संपूर्ण जगभरात साजरा करणार आहे, अशी घोषणा आयसीसीआरसी अध्यक्ष खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी केली आहे. ICCR to celebrate coronation ceremony day of Chatrapati Shivaji Maharaj on 6 June 2022 all over the world

छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन रायगडावर मोठ्या दिमाखात साजरा होत असतो. त्याच बरोबर आता या दिनाचा जगभर डंका वाजणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महान वीर पुरुष आणि रयतेचे जाणते राजे तर होतेच, पण त्याचबरोबर ते सर्वात मोठे स्वातंत्र्य योद्धे होते. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सध्या सुरू असलेल्या आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमाअंतर्गत आयसीसीआर राज्याभिषेक दिन साजरा करणार आहे.

आयसीसीआरच्या जगभरात सध्या 38 शाखा कार्यरत आहेत. अमेरिका, युरोपमधील देश, आफ्रिकेतील देश, आग्नेय आशियातील देश, जपान, चीन या देशांमध्ये या शाखा आहेत. या सर्व शाखांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन 6 जून 2022 रोजी भव्य प्रमाणावर साजरा करण्यात येईल. त्यामध्ये परदेशस्थ भारतीयांनी त्यांच्या मित्रपरिवारासह मोठ्या उत्साहात सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. सहस्रबुद्धे यांनी फेसबुकच्या माध्यमातून केले आहे.

या सर्व केंद्रांवर विशेष कार्यक्रमांमध्ये प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक आणि जीवना संदर्भातील सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असेल. भारताचे संबंधित देशांमधील राजदूत, परराष्ट्र खात्यातील अधिकारी तसेच आयसीसीआरचे पदाधिकारी यामध्ये सहभागी होतील.

ICCR to celebrate coronation ceremony day of Chatrapati Shivaji Maharaj on 6 June 2022 all over the world

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात