आयबीचा अलर्ट : पंजाबात होऊ शकतो दहशतवादी हल्ला, आरएसएस आणि हिंदू नेत्यांना लक्ष्य करण्याची शक्यता


पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय पंजाबमध्ये मोठ्या दहशतवादी हल्ल्याची योजना आखत आहे, विशेषतः आरएसएस शाखा आणि हिंदू नेत्यांना लक्ष्य केले जाऊ शकते. हा इशारा आयबीने पंजाब सरकारला दिला असून त्यानंतर राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंग रंधावा यांनी सर्व अधिकाऱ्यांना गस्त वाढवण्याचे आदेश दिले आहेत. एक तृतीयांश अधिकाऱ्यांना रात्रीच्या गस्त घालण्याचे आदेश दिले आहेत. IB alert Of Terrorist attack in Punjab, possibility of targeting RSS and Hindu leaders


वृत्तसंस्था

चंदिगड : पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय पंजाबमध्ये मोठ्या दहशतवादी हल्ल्याची योजना आखत आहे, विशेषतः आरएसएस शाखा आणि हिंदू नेत्यांना लक्ष्य केले जाऊ शकते. हा इशारा आयबीने पंजाब सरकारला दिला असून त्यानंतर राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंग रंधावा यांनी सर्व अधिकाऱ्यांना गस्त वाढवण्याचे आदेश दिले आहेत. एक तृतीयांश अधिकाऱ्यांना रात्रीच्या गस्त घालण्याचे आदेश दिले आहेत.

नुकतेच 21 नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा मोटारसायकल स्वारांनी पठाणकोटमधील आर्मी कॅम्पजवळ ग्रेनेडने हल्ला केला होता. सुदैवाने त्यात कोणीही जखमी झालेलं नाही. यामागे आयएसआयचा हात असल्याचा संशय आहे. 15 ऑगस्टपासून आतापर्यंत 25 हून अधिक ड्रोन भारतीय हद्दीत घुसले आहेत. शस्त्रे, हेरॉईन आणि टिफिन बॉम्ब पाठवले जात आहेत. 11 टिफिन बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत.आयएसआय पंजाबमध्ये सातत्याने शस्त्रे आणि दारूगोळा पाठवत आहे. अलीकडेच अजनाळा घटनाही दहशतवाद्यांशी संबंधित असल्याचे आढळून आले आहे. अजनाळ्याच्या शर्मा फिलिंग स्टेशनवर झालेल्या स्फोटाच्या घटनेनंतर, पोलिसांनी जवळच्या गावातील चार तरुणांना पकडले होते, रुबल आणि विकी हे दोघेही पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय शीख युवा महासंघाचे प्रमुख भाई लखबीर सिंग रोडे कासिम औरव यांच्या संपर्कात होते.

तीन दिवसांपूर्वी जीरा विधानसभा मतदारसंघातील सेखवान गावातील शेतात टिफिनमध्ये हातबॉम्ब सापडला होता. आयबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयएसआयने पंजाबमध्ये सीमेपलीकडून टिफिन बॉम्ब आणि ग्रेनेड पाठवले आहेत, ज्यामुळे मोठा दहशतवादी हल्ला होऊ शकतो. आयबीने पंजाबमधील हिंदू नेत्यांवर आणि आरएसएसच्या शाखांवर कडक सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यास सांगितले आहे.

IB alert Of Terrorist attack in Punjab, possibility of targeting RSS and Hindu leaders

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”