बाबुल सुप्रियो खासदारपदी राहणार, पण सुरक्षा व्यवस्था आणि दिल्लीतला बंगला सोडणार


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील भाजपचे खासदार बाबुल सुप्रियो यांनी सक्रिय राजकारणातून बाजूला होण्याची घोषणा केली असली तरी आसनसोलच्या खासदारपदाची घटनात्मक जबाबदारी ते पार पाडत राहणार आहेत. परंतु खासदार म्हणून दिल्लीत मिळालेला सरकारी बंगला आणि सुरक्षा व्यवस्था ते सोडून देणार आहेत. I will continue to work constitutionally (as MP) in Asansol, WB. There is politics beyond constitutional post & I withdraw myself from it.

बाबुल सुप्रियो यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती जाहीर केल्याची घोषणा केल्यानंतर ते खासदार की सोडणार की नाही या विषयी पश्चिम बंगालमध्ये जोरदार चर्चा रंगली होती. भाजपमध्ये ते तीव्र नाराज असल्याचे बातम्या आल्या होत्या. तृणमूल काँग्रेसने आम्ही बाबुल सुप्रियो या नेत्याला फारसे महत्त्व देत नाही. ते खासदार राहिले काय आणि नाही राहिले काय आम्हाला काही फरक पडत नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती.

या सगळ्या अटकळींच्या पार्श्वभूमीवर बाबुल सुप्रियो यांनी स्वतःहून काही खुलासे केले आहेत. आसनसोलचा खासदार म्हणून ज्या घटनात्मक जबाबदाऱ्या आहेत त्या पार पाडायचे त्यांनी ठरविले आहे. परंतु, घटनात्मक जबाबदारी च्या पलीकडे जे राजकारण आहे ते करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे दिल्लीत खासदार मिळून म्हणून मिळालेला सरकारी बंगला आणि सुरक्षा व्यवस्था सोडून देण्याचा निर्णय देखील त्यांनी घेतला आहे. ही माहिती खुद्द त्यांनीच एएनआय वृत्तसंस्थेला दिली आहे.

I will continue to work constitutionally (as MP) in Asansol, WB. There is politics beyond constitutional post & I withdraw myself from it.

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात