तुमचा जन्म झाला तेव्हा मी भारत-चीन सीमेवर होतो, कॅ. अमरिंदरसिंग यांनी सिध्दू यांना सुनावले


विशेष प्रतिनिधी

अमृतसर : कॅ. अमरिंदर सिंग यांच्या उपस्थितीत नवज्योत सिंग सिध्दू यांनी पंजाबच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. मात्र, यावेळी कॅ. अमरिंदर सिंग यांनी सिध्दू यांना चांगलेच सुनावले. तुमचा जन्म झाला तेव्हा मी भारत-चीन सीमेवर होतो, असे सांगून अमरिंदरसिंग यांनी सिध्दू यांना जागा दाखविली.I was on the Indo-China border when you were born, Amarinder Singh told Sidhu

नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंजाब काँग्रेसचे नवे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. दीर्घकाळापासून सुरू असलेला अबोला आणि नाराजीनंतर मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंगही या कार्यक्रमाला हजर राहिले.



यावेळी कॅप्टन अमरिंदर यांनी सिद्धू आणि आपल्या नात्याबाबत सांगितले की, जेव्हा सिद्धू जन्मले होते तेव्हापासून मी त्यांच्या कुटुंबाला ओळखतो. सिद्धू यांचा जन्म झाला तेव्हा मी भारत-चीन सीमेवर तैनात होतो. माझी आई आणि सिद्धू यांच्या वडिलांनी सोबत काम केले.

यावेळी बोलताना सिद्धू म्हणाले की, माझे हृदय पक्षाच्या हृदयासारखे नाही. जे माझा विरोध करतील, ते मला आणखी मजबूत बनवतील. मी जाड कातडीचा आहे. कोणी काही म्हटल्याचा माझ्यावर परिणाम होत नाही. मी मुख्यमंत्र्यांसोबत खांद्याला खांदा लावून काम करेन. मला कोणताही अहंकार नाही.

I was on the Indo-China border when you were born, Amarinder Singh told Sidhu

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात