नितीश कुमारांनी घेतली ओम प्रकाश चौटाला यांची भेट; म्हणाले,”यात राजकारण नाही”

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज सायंकाळी हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि लोकदलाचे नेते ओम प्रकाश चौटाला यांची भेट घेतली. यात काहीही राजकारण नाही, असे या भेटीनंतर नितीश कुमार यांनी पत्रकारांना सांगितले. I have respect for him. We have longstanding ties & had told to meet him once I’ll be in Delhi

ओम प्रकाश चौटाला हे काही दिवसांपूर्वीच हरियाणातील शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात दहा वर्षांची शिक्षा भोगून पुन्हा घरी आले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी केंद्रातल्या मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. मोदी सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांना त्यांचा विरोध आहे. मोदी सरकार आज जरी बहुमतात असले तरी ते केव्हाही पडू शकते लोकसभेच्या निवडणुका 2024 पूर्वीच म्हणजे मुदतपूर्व होतील, असे राजकीय भाकीत ओम प्रकाश चौटाला यांनी केले होते.

ओम प्रकाश चौटाला यांचे नातू दुष्यंत सिंग हे हरयाणात भाजप सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. त्यांचा स्वतंत्र पक्ष असला तरी भाजपबरोबर त्यांची हरयाणात युती आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचे आजोबा ओम प्रकाश चौटाला यांनी भाजप विरोधात विधान करणे याला राजकीय महत्त्व आहे.

त्याच बरोबर शिक्षक भरती घोटाळ्यात ज्यांनी दहा वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे अशा ओम प्रकाश चौटाला यांची भेट भाजपच्या पाठिंब्यावर बिहारचे मुख्यमंत्रीपद भूषविणारे नितीश कुमार यांनी घेणे यालाही वेगळे राजकीय महत्त्व आहे.

या भेटीनंतर यात राजकारण नसल्याचा दावा जरी नितीश कुमार यांनी केला असला तरी त्यांचे निकटवर्ती दुसरे नेते आणि जेडीयूचे पार्लमेंटरी बोर्डाचे प्रमुख उपेंद्र कुशवाह यांनी नितीश कुमार यांना ते पंतप्रधानपदाचे मटेरियल आहेत, असे म्हणणे यालाही राजकीय महत्त्व आहे. हे विधान कुशवाह यांनी आजच केले आहे.

जेडीयू हा पक्ष बिहार पुरता मर्यादित असला तरी तो राष्ट्रीय पक्ष आहे. या राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा नितीश कुमार यांनी नुकतेच ललन सिंग यादव यांच्यावर सोपवली आहे.

राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत निमित्त नितीश कुमार हे दोन दिवस दिल्लीत होते. या काळात त्यांच्या पंतप्रधान पदाविषयीच्या बातम्या येणे आणि त्यांनी भाजपवर सडकून टीका करणाऱ्या ओम प्रकाश चौटाला यांची भेट घेणे याला राजकीय वेगळे महत्त्व आहे.

I have respect for him. We have longstanding ties & had told to meet him once I’ll be in Delhi

महत्त्वाच्या बातम्या