केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनाचे फोटो आणि व्हिडिओ हृदय पिळवटून टाकणारे आहेत. राज्यातील कोट्टायमचा एक व्हिडिओही समोर आला आहे. कोट्टायमच्या मुंडकायममध्ये रविवारी मुसळधार पावसामुळे एक घर वाहून गेले. घर वाहून जात असतानाचा व्हिडिओ थरकाप उडवणारा आहे. केरळमध्ये शनिवारपासून मुसळधार पावसामुळे आलेल्या पूर आणि भूस्खलनामुळे किमान 24 जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी दुपारपर्यंत पाऊस थांबला, परंतु अधिकाऱ्यांनी भूस्खलनाच्या धोक्यावर बारीक नजर ठेवलेली आहे. House got washed away by strong water currents of a river in Kottayam Death toll rises to 24 yellow in Kerala alert in 11 districts
वृत्तसंस्था
तिरुवनंतपुरम : केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनाचे फोटो आणि व्हिडिओ हृदय पिळवटून टाकणारे आहेत. राज्यातील कोट्टायमचा एक व्हिडिओही समोर आला आहे. कोट्टायमच्या मुंडकायममध्ये रविवारी मुसळधार पावसामुळे एक घर वाहून गेले. घर वाहून जात असतानाचा व्हिडिओ थरकाप उडवणारा आहे. केरळमध्ये शनिवारपासून मुसळधार पावसामुळे आलेल्या पूर आणि भूस्खलनामुळे किमान 24 जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी दुपारपर्यंत पाऊस थांबला, परंतु अधिकाऱ्यांनी भूस्खलनाच्या धोक्यावर बारीक नजर ठेवलेली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) सोमवारी 11 जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी केला आहे. गंभीर हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी राज्याला मदतीची ऑफर दिली आहे.
कोट्टायम आणि इडुक्की जिल्ह्यातील डोंगराळ भागात शनिवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे अचानक आलेल्या पूर आणि भूस्खलनामुळे लोकांचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. इडुक्कीच्या जिल्हाधिकारी शिबा जॉर्ज यांनी सांगितले की, खराब हवामानामुळे इडुक्कीच्या डोंगराळ भागात प्रवासावर बंदी आहे. आतापर्यंत नऊ मृतदेह सापडले आहेत. दोन जण बेपत्ता आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी फोनवर चर्चा केली आणि पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर चर्चा केली.
#WATCH | Kerala: A house got washed away by strong water currents of a river in Kottayam's Mundakayam yesterday following heavy rainfall. pic.twitter.com/YYBFd9HQSp — ANI (@ANI) October 18, 2021
#WATCH | Kerala: A house got washed away by strong water currents of a river in Kottayam's Mundakayam yesterday following heavy rainfall. pic.twitter.com/YYBFd9HQSp
— ANI (@ANI) October 18, 2021
पीएम मोदी म्हणाले, “मी प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना करतो.” त्यांनी दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हटले, ‘केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे काही लोकांचा मृत्यू झाला हे दुःखद आहे. माझ्या संवेदना शोकग्रस्त कुटुंबांसोबत आहेत.” केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, केरळमधील अतिवृष्टी आणि पुरामुळे प्रभावित लोकांना केंद्र सर्वतोपरी मदत करेल. एका ट्विटमध्ये ते म्हणाले की, “मुसळधार पाऊस आणि पूर पाहता सरकार केरळच्या काही भागातील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे”.
शहा म्हणाले, “केंद्र सरकार गरजू लोकांना शक्य ती सर्व मदत करेल. बचाव कार्यात मदत करण्यासाठी एनडीआरएफची टीम आधीच पाठवण्यात आली आहे. मी सर्वांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करतो. “राज्याचे महसूल मंत्री के. राजन म्हणाले की, मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत दिली जाईल. बचाव कार्यादरम्यान तीन मुलांचे मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. आठ, सात आणि चार वयोगटातील मुले एकमेकांना धरून होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. केरळमधील विरोधी पक्षनेते व्हीडी सतीसन यांनी आरोप केला की, राज्य सरकार प्रभावित भागात वेळेत बचावकार्य सुरू करण्यात अपयशी ठरले आहे. त्यांनी कोक्कयार आणि कुटिकलला भेट दिली होती.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App