आशादायी, भारताच्या बेरोजगारारीत मोठी घट, सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीचा अहवाल


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोनानंतर जनजीवन सुरळित झाल्यानंतर जानेवारी महिन्यात भारताच्या बेरोजगारीच्या दरात मोठी घट आहे. मार्च 2021 नंतर प्रथमच बेराजगारी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. सध्या बेरोजगारीचा दर 6.57 टक्यांवर आली आहे.Hopeful, India’s Unemployment Declines, Report by Center for Monitoring Indian Economy

स्वतंत्र थिंक टॅँक असलेल्या सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या अहवालात ही आकडेवारी देण्यात आली आहे. भारतातील शहरी भागात बेरोजगारीचा दर 8.16 टक्के आहे. ग्रामीण भागातील बेरोजगारी यापेक्षा खूपच कमी म्हणजे 5.84 टक्के आहे.



अहवालानुसार डिसेंबरमध्ये बेरोजगारीचा दर 7.91 टक्के होता. त्यावेळी शहरी भागातील दर 9.30 ग्रामीण भागात 7.28 टक्के होता. तेलंगणामध्ये सर्वात कमी म्हणजे 0.7 टक्के बेरोजगारी आहे. हरियाणामध्ये सर्वात जास्त म्हणजे 23.4 टक्के आहे.

गुजरातमध्ये बेरोजगारी दर (1.2 टक्के), मेघालय (1.5 टक्के) आणि ओडिशा (1.8 टक्के) का स्थान रहा। हरियाणानंतर राजस्थानमध्ये 18.9 टक्के बेरोजगारी आहे. 2021 मध्ये बेरोजगारांची संख्या 5.3 कोटी होती. त्यामध्ये महिलांची संख्या मोठी आहे.

सेंटर फॉर मॉनिटरिंग इकॉनॉमीचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश व्यास यांनी सांगितले की, डिसेंबरमध्ये साडेतीन कोटी लोक रोजगार शोधत होते. त्यामध्ये 80 लाख महिला होत्या.

Hopeful, India’s Unemployment Declines, Report by Center for Monitoring Indian Economy

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात