इतिहास घडला; भारतीय महिला हॉकी संघाची उपांत्य फेरीत धडक; तीन वेळच्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला हरवले


वृत्तसंस्था

टोकियो : भारतीय हॉकीच्या इतिहासात आज एक नवा अध्याय लिहिला गेला. टोकियो ऑलिंपिकमध्ये भारतीय महिला संघाने तीन वेळच्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला 1- 0 असे हरवून उपांत्य फेरीत धडक मारली आहे. History happened; Indian women’s hockey team reaches semifinals; Three-time world champions Australia lost

भारतीय महिला संघाची ही अतुलनीय कामगिरी हॉकीच्या इतिहासात प्रथमच घडते आहे. गुरुजीतने पहिल्या हाफमध्ये ऑस्ट्रेलियावर गोल करून आघाडी मिळवली. ती भारताने अखेरपर्यंत कायम टिकवली. आक्रमण आणि बचाव यांचा सुरेख मिलाफ साधत ऑस्ट्रेलियाला भारतीय संघावर आक्रमण करण्याची संधीच दिली नाही. ऑस्ट्रेलियाचा महिला संघ भारतावर एकही गोल करू शकला नाही.

याआधी भारताने दक्षिण आफ्रिकेचा 43 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला पराभूत केल्यामुळे भारतीय महिला संघाची पदक मिळवण्याची आशा वाढली आहे. महिला संघाचे मनोधैर्य अतिशय उंचावले आहे. पुढील सामन्यात अधिक चमकदार कामगिरी करण्याची करण्याचा त्यांचा आत्मविश्वास आहे.

History happened ; Indian women’s hockey team reaches semifinals; Three-time world champions Australia lost

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण