त्यांच्या पक्षाचा साधा सरपंचही नाही, तरीही संजय राऊत गोव्या का येतात? गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा सवाल


विशेष प्रतिनिधी

पणजी : संजय राऊत गोव्यात का येतात हे मला माहित नाही ! त्यांच्या पक्षाचा गोव्यात साधा सरपंचही नाही.त्यामुळे ते कुणाला येऊन भेटतात आणि काय करतात हे त्यांचे त्यांना विचारायला हवे, असा सवाल गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केला आहे.His party does not even have a sarpanch, yet why does Sanjay Raut come to Goa? Question from Goa Chief Minister Pramod Sawant

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज्यात भाजपच पुन्हा सत्तेवर येणार असल्याचा विश्वास व्यक्त करून सावंत म्हणाले, गोव्यात यावेळी भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार येणार आहे. 2022 मघ्ये 22 प्लसचा नारा असून स्वयंपूर्ण गोव्यासाठी मतदार भाजपलाच मतदान करतील.



गोव्यात अस्तित्वच नसलेले पक्ष (तृणमूल काँग्रेस, आप) प्रयोग करण्यासाठी आले आहेत. बाहेरून आलेल्या पक्षांनी एकदा गेल्या निवडणूका आठवून पाहाव्यात.संजय राऊत गोव्यात का येतात हे त्यांचे त्यांनाच ठाऊक ! शिवसेनेचा साधा सरपंचही गोव्यात नाही.

सावंत म्हणाले, अन्य राजकीय पक्षांचे आमदार फोडून सरकार स्थापन करण्याचा काळ आता संपला. कोरोना काळात प्रकल्पांची उदघाटने राहिली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुका आता जाहीर होणे अपेक्षित असताना ही उदघाटने होत आहेत. गोवा प्रगती कार्यक्रमाअंतर्गत वेगवेगळ्या विभागाने केलेली कामे आम्ही लोकांपुढे घेऊन जात आहोत.

इथे डबल इंजिन सरकार आहे. केंद्रात मोदींजींचे सरकार आणि राज्यातही भाजपचे सरकार येणार. आत्मनिर्भर भारत स्वयं पूर्ण गोवा हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने राबवला. तो परत एकदा लोकांकडे घेऊन जाणार आहे. गोवा मुक्तीनंतरच्या 60 वर्षांच्या इतिहास जितका विकास झाला नाही तितका डबल इंजिन सरकारने केला आहे.

तो लोकांपुढे घेऊन जाणार आहोत. आमचे रिपोर्ट कार्ड तयार आहे. आम्ही केलेली कामे लोकांपुढे घेऊन जाणार आहोत. शिवसेना, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टी या पक्षांचे मुळात गोव्यात अस्तित्व नाही. त्यामुळे महाविकास आघाडी किती चालेल ? कशापद्धतीने चालेल ? हा मुद्दा आहे. कोण कुणाला ऑक्सिजन पुरवतो आहे ते मला माहित नाही.

पूर्ण गोवेकरांचा माझ्यावर, भाजप आणि मोदींजींवर विश्वास आहे. आम्ही केलेली कामे घेऊन लोकांपुढे जाणार आहोत. त्यांच्या उद्देश आहे भाजपला हरवणे. आमचा उद्देश आहे जनतेच्या सेवेसाठी परत एकदा सत्तेत येणंङ्घ स्वयं पूर्ण गोव्यासाठी आम्ही लोकांना साद दिलीय, तुम्ही आम्हाला सेवेसाठी पुन्हा एकदा संधी द्यावी .

मोदींनी गोव्याच्या विकासासाठी गेल्या 8 वर्षात 22 हजार कोटी दिले ते कायम लोकांच्या लक्षात राहील, असे सांगून सावंत म्हणाले, बाकी अन्य कुणी इथे येऊन प्रयोग करायचा प्रयत्न करीत असेल तर आमची जनता सुज्ञ आहे. खरं काय आणि खोटं काय हे त्यांना समजते. त्यामुळे दिल्लीवाल्यांच्या ते बळी पडणारे नाही. दिल्लीत किती प्रदुषण आहे

आणि पश्चिम बंगालमध्ये किती असंस्कृतिरित्या राज्य चालवले जाते हे सर्व समाज माध्यमे आणि प्रसारमध्यमांवर पाहात आहेत. बाहेरून आलेल्या राजकीय पक्षांना त्यांना मागची निवडणूक आठवण करून देणे गरजेचे आहे. काँग्रेसच्या आमदारांची संख्या किती आहे ते आधी दिगंबर कामत यांनी बघावे. या विधानसभा सभेत आता काँग्रेसचा एकच आमदार राहिला आहे..त्यामुळे आमच्या आमदारांच्या संख्येची चिंता त्यांनी करू नये.

His party does not even have a sarpanch, yet why does Sanjay Raut come to Goa? Question from Goa Chief Minister Pramod Sawant

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात