विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराने घरातला फ्रीज झाला सुपरस्मार्ट


कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आता अनेक क्षेत्रांमध्ये होऊ लागला आहे. याच तंत्रज्ञानाचा वापर करून तुमच्याशी संवाद साधणारा फ्रिज बनवण्यात संशोधकांना यश आले आहे. जगभरात विविध कंपन्यांमध्ये तीव्र स्पर्धा सुरु आहे. त्यातून अनेक नवनव्या वस्तू आकाराला येत असल्याचे पहायला मिळते. सॅमसंग कंपनीचा हा फ्रिज तुमच्या आहाराची नोंद ठेवेल व तुम्हाला रेसिपीही सुचवेल.The use of artificial intelligence froze the house SuperSmart

या फ्रिजच्या एका दरवाजावर मोठी टच स्क्रीन व रोबो व्हाइस असिस्टंटही आहे. त्यामुळे तुम्ही फ्रिजला संगीत, किंवा गाणी लाव, हे वाचून दाखव अशा सूचनाही देऊ शकाल. या फ्रिजच्या दारावर कॅमेराही बसवला आहे. त्याद्वारे वापरकर्त्याला फ्रिजमध्ये काय आहे, हे स्मार्टफोनवरही दिसू शकेल.

या फ्रिजमध्ये तुम्ही बरीचशी ऍप्ससुद्धा इन्स्टॉल करू शकता आणि याचा वापर कॅलेंडर, टीव्ही, म्युझिक प्लेअर व नोटीस बोर्ड म्हणूनही करू शकता. फ्रिजवरील कॅमेरे आणि वेगवेगळी ऍप्स एकत्रितपणे काम करून तुम्हाला घराबद्दल माहितीही पुरवत राहतील. सर्व स्मार्ट उपकरणे एकमेकांना जोडलेली असून, ती स्मार्टफोनवरून नियंत्रित करता येऊ शकतील. व्हाइस असिस्टंटच्या मदतीने तुम्ही दिवसभरात किती कॅलरीज घेतल्या हेही तपासून शकता.

हा फ्रिज तुम्हाला रेसिपी सुचवू शकेल किंवा तुम्ही स्वयंपाक करताना रेसिपीच्या स्टेप्स वाचून दाखवेल. थोडक्याित, भविष्यात किचन स्मार्ट आणि इंटरऍक्टिपव्ह होणार आहे. कऱे पहायचे म्हटले तर एऱादी व्यक्ती घरात जशी तुम्हाला उपयुक्त ठरते अगदी त्याचप्रमाणे या वस्तूदेखील भविष्यात उपयोग ठरु लागणार आहेत. कारण त्यांना कृत्रीम बुद्धीमत्तेची जोड व्यापक प्रमाणात देण्यात येत आहे.

The use of artificial intelligence froze the house SuperSmart

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात