बरे झाले हिमाचलमध्ये भाजपचा “नैतिक विजय” नाही झाला; पण रामपूर आणि कुडनीचा संदेश काय??


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : बरे झाले हिमाचल मध्ये भाजपचा “नैतिक विजय” नाही झाला, पण रामपूर आणि कुडनीचा संदेश काय??, हे शीर्षक थोडे विचित्र वाटेल. पण हिमाचल प्रदेशची विधानसभा निवडणूक निकाल आणि उत्तर प्रदेशातील रामपूर आणि बिहार मधील कुडणी पोटनिवडणुकीचा निकाल याकडे बारकाईने पाहिले तर या शीर्षकाचे वेगळेपण निश्चित लक्षात येईल. किंबहुना त्याची उचितता लक्षात येईल. Himachal and byelections results : BJP is very much assertive in dismantling the future challenges in hindi belt for 2024

हिमाचल प्रदेशात भाजपचा जागांच्या दृष्टीने मोठ्या अंतराने पराभव झाला. काँग्रेसला तिथे 40 जागा मिळाल्या, तर भाजपला 25. पण भाजप आणि काँग्रेस यांच्या मतांच्या टक्केवारीतील अंतर मात्र फक्त 1 टक्क्याचे आहे. खरं म्हणजे त्याहीपेक्षा कमी आहे आणि हिमाचल विधानसभा निवडणुकीतल्या निकालाचे हेच खरे इंगित आहे. एरवी कोणताही पक्ष पराभूत झाला आणि मतदानाची टक्केवारी समाधानकारक असली तर त्या पक्षाचे नेते आमच्या पक्षाचा “नैतिक विजय” झाला आहे, असे जाहीररित्या सांगत असतात. पण आज गुजरातच्या विजय उत्सवात भाजपच्या मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी हिमाचल मधला पराभव हा भाजपचा “नैतिक विजय” आहे, असे अजिबात सांगितले नाही. उलट त्यांनी पराभव मान्य करून तिथे भरपूर कष्ट केलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांचे आणि नेत्यांचे अभिनंदन करून मतदारांचे आभार मानले.

यात औपचारिकता होती हे स्वीकारले तरी देखील मोदी आणि नड्डा यांनी एक बाब विशेषत्वाने अधोरेखित केली, ती म्हणजे भाजप आणि काँग्रेस यांच्यातील मतांच्या टक्केवारीतील अंतर 1 टक्क्यांपेक्षा कमी आहे, हे त्यांनी आवर्जून लक्षात आणून दिले. भाजपला 40 % पेक्षा जास्त मते आहेत, हे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आणि इथेच भाजपच्या पुढच्या रणनीतीची चुणूक त्यांनी दाखवून दिली आहे.

भाजपची लढाई इथून पुढच्या प्रत्येक निवडणुकीत विरोधी पक्षांशी असण्यापेक्षा मतदानातली आपली टक्केवारी जास्तीत जास्त कशी वाढेल हे पाहण्याची राहणार आहे. हेच मोदी आणि नड्डा यांनी “बिटवीन द लाईन्स” भाषेत समजावून सांगितले आहे. कार्यकर्त्यांना हेच खरे मोटिव्हेशन आहे. आपला विजय होणार आहे हा आत्मविश्वास देऊन त्यात भाजपच्या मतदानाची टक्केवारी कशी वाढवायची हेच टार्गेट मोदी आणि नड्ड्यांनी कार्यकर्त्यांना आज कार्यकर्त्यांना दिले आहे. या अर्थाने मोदी आणि नड्डा या दोन्ही नेत्यांनी हिमाचलमध्ये विधानसभेच्या आमदारांच्या आकडेवारीत भाजपचा पराभव झाला असला तरी टक्केवारीत मतदानाच्या टक्केवारीत “नैतिक विजय” झाल्याचे वक्तव्य केलेले नाही. दबंग आजम खान यांना धक्का

जे हिमाचल प्रदेशाच्या बाबतीत तेच थोडे वेगळे रामपूर आणि कुडणी या मतदार संघाच्या बाबतीत घडले आहे. इथे तर भाजपने विरोधी पक्षांकडून विजय खेचून आणला आहे. उत्तर प्रदेशातल्या रामपूर विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक झाली. हे तेच रामपूर आहे, ज्याच्यावर समाजवादी पक्षाचे दबंग नेते आजम खान यांचा वर्षानुवर्षे कब्जा होता. त्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची या मतदार संघात दहशत होती. त्यांच्या कब्जातून रामपूर मतदारसंघ सोडवून घेणे ही सोपी बाब नव्हती. पण भाजपच्या आकाश सक्सेना या उमेदवाराने तब्बल 36000 पेक्षा जास्त मतांनी रामपूर मतदारसंघ जिंकून दाखवला आहे. भाजपने संघटनात्मक ताकद लावून हा मतदारसंघ आजम खान यांच्या ताब्यातून खेचून घेतला आहे. हे या पोटनिवडणुकीचे वैशिष्ट्य आहे. उत्तर प्रदेशात दबंग नेत्यांसाठी भाजपने दिलेला हा स्पष्ट इशारा आहे.

 नितीश – तेजस्वी यांना धक्का

बिहारमधल्या किडनी मतदारसंघात भाजपने जो विजय मिळवला आहे तो मुख्यमंत्री नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्या महागठबंधन विरोधातला विजय आहे. भाजपचा हा विजय मतांच्या अंतराच्या दृष्टीने छोटा असला तरी महागठबंधन करून आपण चूक तर केली नाही ना या शंकेची पाल भाजपने नितीशकुमार यांच्या मनात चूकचुकायला लावली आहे. नितीश कुमार यांनी भाजपशी संबंध तोडून तेजस्वी यादवांची संधान बांधले. कुडनीच्या पोटनिवडणुकीत जर त्यांच्या उमेदवाराला यश मिळाले असते तर महागठबंधन यशस्वी केल्याची बढाई त्यांना मारता आली असती पण आता ते शक्य नाही. महागठबंधन करण्यातली हवा कुडनीच्या मतदारांनी काढून घेतली आहे.

 हिंदी पट्ट्यात चॅलेंज नाही

मोदी आणि नड्डा यांनी या दोन पोटनिवडणुकांचा आपल्या भाषणात आवर्जून उल्लेख केला आहे. याचा नेमका अर्थ हाच आहे की हिंदी पट्ट्यात भाजपला 2024 साठी कुठलाही चॅलेंज शिल्लक ठेवायचा नाही आणि कोणी वेगळ्या पद्धतीने चॅलेंज करत असेल तर तो मोडून काढण्यासाठी भाजप आक्रमकच राहील. रामपूर आणि कुडनी या दोन पोटनिवडणुकांचा सर्व विरोधी पक्षांना हा संदेश आहे.

Himachal and byelections results : BJP is very much assertive in dismantling the future challenges in hindi belt for 2024

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण