Hijab Ban Karnataka HC : हिजाब बंदीचा कोर्टाचा निर्णय अमान्य; कर्नाटकात मुस्लीम विद्यार्थ्यांचा परीक्षेवर बहिष्कार!!


वृत्तसंस्था

बेंगलुरू : हिजाब हा मुस्लिम धर्माचा अविभाज्य भाग नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हिजाबचा आग्रह धरू नये. तसेच शालेय नियमांचे पालन करावे असे निर्देश कर्नाटक हायकोर्टाने मंगळवारी दिल्यानंतर तसे देशात अनुकूल-प्रतिकूल पडसाद उमटले असताना कर्नाटकातून एक वेगळाच प्रकार समोर आला आहे कर्नाटक हायकोर्टाने दिलेल्या शाळेतील हिजाब बंदीच्या या निकालाच्या विरोधात स्थानिक मुस्लिम विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. Hijab Ban Karnataka HC muslim student

– 35 विद्यार्थी कॉलेजमधून बाहेर पडले

कर्नाटक उच्च न्यायालयाने हिजाब प्रकरणावर निकाल दिल्यानंतर अवघ्या काही तासांनंतर, कर्नाटकातील यादगीर येथील विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार घातला. विद्यार्थ्यांना कर्नाटक हायकोर्टाच्या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन केले होते. पण त्यांनी नकार दिला आणि परीक्षा हॉलमधून बाहेर पडले. एकूण 35 विद्यार्थी कॉलेजमधून बाहेर पडले, अशी माहिती समोर आली आहे. कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर येथील सरकारी कनिष्ठ महाविद्यालयात 27 डिसेंबर 2021 रोजी हिजाबवरून वाद सुरू झाला होता. हिजाब घालून आलेल्या मुस्लीम विद्यार्थिनींना महाविद्यालयात प्रवेश नाकारण्यात आला.

– हिजाबला परवानगी नाही

कर्नाटक राज्य सरकारने जारी केलेल्या ड्रेस कोडबाबतच्या नियमानुसार हिजाब परिधान करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असा कडक आदेश महाविद्यालयीन अधिकाऱ्यांनी देऊनही काही मुस्लीम विद्यार्थिनी आपल्या पालकांसह महाविद्यालयात आल्या असता, त्यांना महाविद्यालयीन परिसराच्या बाहेर उभे करण्यात आले होते. त्यामुळे मुलींसह त्यांच्या पालकांनीही गेटबाहेर निदर्शने केली. तसेच सहा विद्यार्थीनींनी याप्रकरणी हायकोर्टात धाव घेतली होती. परंतु, गणवेशास प्राधान्य देत हायकोर्टाने या विद्यार्थीनींची याचिका फेटाळून लावली आहे.

Hijab Ban Karnataka HC muslim student

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात