हर्ष गोयंकांची कुंभमेळ्यातील साधूंवर आक्षेपार्ह टिप्पणी, बायकॉट सिएट म्हणत लोकांनी व्यक्त केला संताप


कुंभमेळ्यातील साधूंवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्यामुळे रामप्रसाद गोयंका ग्रुपचे अध्यक्ष हर्ष गोयंका यांच्यावर सोशल मीडियात टीकेचा भडीमार होत आहे. सिएट टायर कंपनीचे मालक असलेल्या गोयंकांच्या विरोधात बायकॉट सिएट असा हॅशटॅगही ट्रेंडींग आहे. Harsh Goenka’s offensive remarks on Kumbh Mela monks, people express outrage


विशेष प्रतिनिधी 

नवी दिल्ली : कुंभमेळ्यातील साधूंवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्यामुळे रामप्रसाद गोयंका ग्रुपचे अध्यक्ष हर्ष गोयंका यांच्यावर सोशल मीडियात टीकेचा भडीमार होत आहे. सिएट टायर कंपनीचे मालक असलेल्या गोयंकांच्या विरोधात बायकॉट सिएट असा हॅशटॅगही ट्रेंडींग आहे.

गोयंका यांनी गुरूवारी कुंभमेळ्यातील साधूंचा स्नान करतानाचा फोटो ट्विट केला होता. साधूंच्या लंगोटाची खिल्ली उडविताना गोयंका यांनी लिहिले होते की आंतरराष्ट्रीय माध्यमे हे फोटो पाहिल्यावर म्हणत आहेत की मास्क थोडासा खालीच घातला आहे.



साधूंच्यावर या आक्षेपार्ह टिप्पणीनंतर गोयंकांविरुध्द संताप व्यक्त केला जात आहे. त्यातच गोयंका यांनी ट्विट केलेला फोटो हरिद्वारचा आताच्या नसून २०१३ च्या कुंभमेळ्याचा असल्याचे उघड झाल्यावर तर संताप आणखीनच वाढला. अनेकांनी आपण सिएट टायरचे शेअर्स विकणार असल्याचे सांगितले. सिएट टायर वापरू नका असे आवाहन करत बायकॉट सिएट असा हॅशटॅगही ट्रेंडींगमध्ये आला.

हिंदू धर्मावर टीका करण्याची गोयंका यांची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी भगवान शंकरांचा अपमान केला होता. त्यावेळी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले होते की, भगवान शंकर एकदा पृथ्वीवर आले आणि एका बारमध्ये गेले. पाच बाटल्या व्हिस्की पिल्यावर त्यांनी पाच बाटल्या रमही पिली.

तरीही त्यांना शांत पाहून बारटेंडरने विचारलेकी तुम्ही कोण आहात की अद्याप मद्य चढले नाही. त्यावर ते म्हणाले, मी भगवान शंकर आहे. यावर तो बारटेंडर म्हणाला आता याला चढली! अनेकांनी गोयंकांचे जुने हिंदूविरोधी ट्विटही पुन्हा व्हायरल करत त्यांच्यावर संताप व्यक्त केला आहे.

Harsh Goenka’s offensive remarks on Kumbh Mela monks, people express outrage


इतर बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात