कर्नाटक, उत्तराखंड नंतर गुजरातेतही फिरवली भाकरी…. विजय रूपाणींच्या राजीनाम्यापूर्वीपासूनच ‘टीम गुजरात’मध्ये सुरू झाली होती खांदेपालट


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून विजय रूपानींनी दिलेला राजीनामा बहुतेकांना धक्कादायक व आश्चर्यकारक वाटला असेलही, पण त्याची स्क्रिप्ट काही महिन्यांपासूनच लिहिली गेली होती. एका वाक्यात सांगायचे झाले तर गुजरातमध्ये मोदी-शहांनी भाकरी फिरवली आहे. यापूर्वी कर्नाटकातून भीष्माचार्य बी.एस. येडीयुरप्पांना, तर उत्तराखंडमधून वादग्रस्त तीरथ सिंह रावत यांना असेच बदलण्यात आले होते. Guajara witnessed change in guard after Karnataka and Uttarakhand

विधानसभेला निवडणुकीला एक वर्षे राहिले असताना आॅपरेशन गुजरात चालू झाले होते. सर्वप्रथम गेली सात वर्षे गुजरातचे शक्तिशाली प्रभारी राहिलेले भूपेंद्र यादव हे केंद्रीय मंत्री झाल्याने आपसूकच टीम गुजरातमधून बाहेर पडले गेले. त्यापाठोपाठ अतिशय प्रभावशाली असलेले गुजरात भाजपचे संघटनमंत्री भिकूभाई दलसानियांना बाजूला केले गेले. पहिल्यांदा त्यांना दीड महिना ताटकळत ठेवले आणि नंतर बिहारमध्ये प्रदेश संघटनमंत्री म्हणून रवानगी केली गेली. या दोघांपाठोपाठ रूपानींचा राजीनामा आला आहे.

म्हणजे कोअर कमिटीतील मुख्य चौघांपैकी तिघे आता बाजूला फेकले गेले आहेत. फक्त प्रदेशाध्यक्ष व नवसारीचे खासदार सी.आर. पाटील हेच आपले पद टिकवून आहेत. पाटील हे मोदी व शहांचे अतिशय निकटवर्तीय आहेत. म्हणून तर मूळचे महाराष्ट्रीयन असलेल्या पाटील यांना गुजरात प्रदेशाध्यक्ष करताना मोदी-शहा अजिबात अडखळले नव्हते.

नोव्हेंबर २०२२ मध्ये गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक अपेक्षित आहे. मागील वेळी २०१७मध्ये भाजपने अडखळत विजय (१८१ पैकी ९९) मिळविला होता. काँग्रेसने दमदार कामगिरी केली होती. पण त्यानंतर काँग्रेसला गळती लागत गेली आणि दहापेक्षा जास्त आमदार भाजपमध्ये सामील झाले.

राजकीयदृष्ट्या विचार केला तर २०१७च्या तुलनेत भाजपसमोर काँग्रेसचे आव्हान नाही. गुजरात काँग्रेस गलितगात्र अवस्थेत आहे. २०१७ला भाजपच्या नाकात दम आणणारा पटेल समुदायाचा नेता हार्दिक पटेल हा प्रदेश कार्याध्यक्ष आहे; पण पक्षांतर्गत गटबाजीने हार्दिक पटेल चांगलेच नाराज आहेत.

Guajara witnessed change in guard after Karnataka and Uttarakhand

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात