Vijay Rupani Resigns : विजय रुपाणींचा राजीनामा, आता गुजरात मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत ही नावे आघाडीवर

Vijay Rupani Resigns : गुजरातमध्ये शनिवारी मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि पक्षश्रेष्ठींचे आभार मानले. थोड्या वेळापूर्वी, रुपाणी यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांची भेट घेऊन त्यांना राजीनामा सादर केला. Vijay Rupani Resigns now these three leaders are in race for post of Gujarat Chief Minister


विशेष प्रतिनिधी

अहमदाबाद : गुजरातमध्ये शनिवारी मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि पक्षश्रेष्ठींचे आभार मानले. थोड्या वेळापूर्वी, रुपाणी यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांची भेट घेऊन त्यांना राजीनामा सादर केला.

राजीनामा दिल्यानंतर विजय रुपाणी म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे विशेष मार्गदर्शन मिळत राहिलेले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली गुजरातने नवीन आयामांना स्पर्श केला आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये मला योगदान देण्याच्या संधीसाठी मी पंतप्रधान मोदीजींचे आभार व्यक्त करतो. नव्या नेतृत्वात ऊर्जा घेऊन पुढे जायला हवे हे लक्षात घेऊन मी पदाचा राजीनामा दिला आहे.

गुजरात मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत ही नावे आघाडीवर

गुजरातच्या मुख्यमंत्रिपदावरून विजय रुपाणी यांनी राजीनामा दिल्यानंतर आता प्रश्न निर्माण होत आहे की, राज्याचा पुढील मुख्यमंत्री कोण असेल? सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत तीन नावे आघाडीवर आहेत. या नावांमध्ये केंद्रीय मंत्री मनसुख मंडाविया, जे सध्या केंद्रीय आरोग्यमंत्री आहेत त्यांचेही नाव समाविष्ट आहे. जुलै महिन्यातच मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात मनसुख मंडाविया यांना केंद्रीय आरोग्य मंत्री करण्यात आले आहे. दुसरे नाव सध्याचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांचे आहे. याशिवाय प्रदीपसिंह जडेजा आणि सौरभ पटेल यांचेही नाव घेतले जात आहे.

गुजरातमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका

पुढील वर्षी डिसेंबर 2022 मध्ये गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्याआधी विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. मुख्यमंत्री म्हणून शनिवारी झालेल्या एका कार्यक्रमात रूपाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत उपस्थित होते. हा कार्यक्रम व्हर्च्युअल पद्धतीने झाला, परंतु पंतप्रधान मोदी, विजय रूपाणी, उपमुख्यमंत्री नितीन पटेल इत्यादींनी या कार्यक्रमात भाग घेतला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी सरदारधाम भवनाचे उद्घाटन केले.

आगामी निवडणुका नवीन नेतृत्वासह लढणार भाजप

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता नव्या नेतृत्वासह भाजप गुजरातमध्ये पुढील निवडणूक लढवणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून आम आदमी पक्षही राज्यात भाजपला कडवी स्पर्धा देत आहे. आम आदमी पक्षाने रूपाणी सरकारला जोरदार घेरले आहे, कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेसह अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत, तर काँग्रेसने गेल्या गुजरात निवडणुकांमध्येही चांगली कामगिरी केली होती. तेव्हापासून काँग्रेसचे कार्यकर्तेही गुजरातमध्ये सक्रियपणे मुद्दे मांडत आहेत. काही वर्षे वगळता गुजरातमध्ये 1995 पासून बहुतांश भाजपचे सरकार आहे. सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही दीर्घकाळ गुजरातचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत.

भाजपने उत्तराखंड, कर्नाटकातही मुख्यमंत्री बदलले

गेल्या काही महिन्यांत भाजपने काही राज्यांचे मुख्यमंत्री बदलले आहेत. उत्तराखंडचे मुख्यमंत्री यापूर्वी दोनदा बदलले गेले, तर अलीकडेच येडियुरप्पा यांना कर्नाटकचे मुख्यमंत्रिपद सोडावे लागले. उत्तराखंडमध्ये तिरथ सिंह रावत यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवल्यानंतर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने पुष्कर सिंह धामी यांना नवे मुख्यमंत्री बनवले. पुढील वर्षी उत्तराखंडमध्येही विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याचबरोबर कर्नाटकात पक्षाने येडियुरप्पा यांच्या जागी बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली आहे.

Vijay Rupani Resigns now these three leaders are in race for post of Gujarat Chief Minister

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात