साकीनाका ‘निर्भया’ प्रकरण : ३० वर्षीय पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी, आरोपी गजाआड, महाराष्ट्रातून संतापाची लाट

mumbai saki naka rape Victim Dies In Hospital woman tortured with an iron rod

saki naka rape Victim Dies In Hospital : मुंबईतील 30 वर्षीय बलात्कार पीडितेचा शनिवारी मृत्यू झाला. घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचाराच्या तिसऱ्या दिवशी तिचा मृत्यू झाला. 9 सप्टेंबर रोजी साकीनाका परिसरातील खैरानी रोडवर बलात्कारानंतर ती बेशुद्ध अवस्थेत आढळली होती. नराधमांनी बलात्कारानंतर पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड घातला होता. अत्यंत गंभीर अवस्थेत पीडितेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जखमी अवस्थेत तिच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्त वाहून गेले होते. mumbai saki naka rape Victim Dies In Hospital woman tortured with an iron rod


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबईतील 30 वर्षीय बलात्कार पीडितेचा शनिवारी मृत्यू झाला. घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचाराच्या तिसऱ्या दिवशी तिचा मृत्यू झाला. 9 सप्टेंबर रोजी साकीनाका परिसरातील खैरानी रोडवर बलात्कारानंतर ती बेशुद्ध अवस्थेत आढळली होती. नराधमांनी बलात्कारानंतर पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड घातला होता. अत्यंत गंभीर अवस्थेत पीडितेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जखमी अवस्थेत तिच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्त वाहून गेले होते.

या घटनेचा एक सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला, ज्याच्या आधारे आरोपीला पोलिसांनी अटक केली. ही घटना रात्री उशिरा 2.30 ते 3 च्या दरम्यान घडली. व्हिडिओमध्ये बलात्कारानंतर आरोपी महिलेला रॉडने जखमी करताना दिसत आहे. पीडितेला टेम्पोमध्ये टाकून आरोपी तेथून फरार झाला. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आरोपींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. ते म्हणाले की, मी स्वतः या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे आणि प्रत्येक क्षणाचे अपडेट घेत आहे.

साकीनाका परिसरातील या घटनेने दिल्लीतील निर्भया प्रकरणाच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. पोलीस नियंत्रण कक्षाला शुक्रवारी पहाटे फोन आला की, खैराणी रोडवर एक पुरुष एका महिलेला मारहाण करत आहे. महिलेचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले, तेव्हा पीडिता रक्ताने माखलेल्या अवस्थेत आढळली. ताबडतोब तिला महानगरपालिकेच्या राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले.

आरोपीवर बलात्कार आणि खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

ही घटना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोच्या आत घडली. अधिकाऱ्याने सांगितले की, वाहनाच्या आत रक्ताचे डागदेखील सापडले आहेत. पोलिसांनी कारवाई करत आरोपी चौहानला भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम 307 (खुनाचा प्रयत्न) आणि 376 (बलात्कार) अंतर्गत अटक करण्यात आली आणि पुढील तपास सुरू आहे.

रॉड घातल्याने आतडे बाहेर आले होते

पीडित महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात आली, पण तिला वाचवण्यात यश आले नाही. डॉक्टरांनी सांगितले आहे की, रॉड आत घातल्यामुळे महिलेचे आतडे बाहेर आले होते. अखेर तिची प्राणज्योत मालवली. या अमानुष घटनेमुळे राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे.

mumbai saki naka rape Victim Dies In Hospital woman tortured with an iron rod

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण