भूक भागेना : केंद्राकडून मेपर्यंतची 14145 कोटींची जीएसटी भरपाई; तरीही पवार म्हणाले, अजूनही 15000 कोटी बाकी!!


प्रतिनिधी

नवी दिल्ली : राज्यांना केंद्र सरकारकडून देण्यात येणारी जीएसटी भरपाईची रक्कम ३१ मे पर्यंत पूर्ण दिली. यानुसार, २१ राज्यांना ८६ हजार ९१२ कोटी रुपयांची भरपाई रक्कम देण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षात राज्यांना त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत सांभाळताना हातभार लागावा यासाठी ही भरपाई देण्यात आली आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने एका निवेदनात ही माहिती दिली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-मे या कालावधीसाठी या एकूण भरपाईपैकी महाराष्ट्राला १४,१४५ कोटी रुपये देण्यात आले आहेत.GST compensation of Rs 14,145 crore from Center till May; However, Pawar said, there is still Rs 15000 crore left!

जीएसटी भरपाई निधीमध्ये केवळ २५ हजार कोटी रुपयेच असतानाही वरील भरपाई देण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. जीएसटीमुळे राज्यांच्या महसुलावर परिणाम झाला आहे. त्यामुळे उत्पन्नाच्या स्रोतांमधील कमतरता भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांना उसनवारी करून २०२०-२१ मध्ये १.१ लाख कोटी रुपयांची भरपाई दिली. २०२१-२२मध्ये राज्यांना १.५९ लाख कोटी रुपये भरपाई दिली गेली.



केंद्र सरकारच्या जीएसटी भरपाईच्या वाटपावरून महाराष्ट्र सरकारने नाराजी व्यक्त केली आहे. अजूनही केंद्र सरकारकडे महाराष्ट्राच्या जीएसटी भरपाईचे १५००० कोटी बाकी आहेत, असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.

महाराष्ट्राच्या वाट्याचे जीएसटीचे अजूनही 15000 कोटी रुपये केंद्राकडे थकीत आहेत. यामुळे केंद्र सरकारने आता तेही द्यावेत. केंद्र सरकारने आता दिलेला जीएसटीचा हा पैसा ३१ मार्चपर्यंत परत यायला हवा होता. केंद्रासमोरही काही समस्या असतील. यामुळे दिरंगाई झाली असेल पण आता जीएसटीचा उर्वरीत थकीत निधी देऊन महाराष्ट्राला दिलासा द्यावा, अशी मागणी अजित पवार यांनी केली.

जीएसटी भरपाईसाठी सातत्याने आम्ही केंद्र सरकारकडे पाठपुरवा करत आहोत. केंद्र सरकारकडे महाराष्ट्राच्या जीएसटीचे एकूण २९,६४७ कोटी रुपये थकीत होते. त्यापैकी केंद्र सरकारने जीएसटीचे १४,१४५ कोटी आहेत. केंद्र सरकारने आमचा सर्व निधीचा दावा फेटाळलेला नाही. यामुळे उर्वरीत १५००० कोटींचा निधीही केंद्र सरकारकडून लवकरच मिळेल, असा दावा महाराष्ट्राचे अतिरिक्त सचिव (अर्थ) मनोज शौनिक यांनी केला.

GST compensation of Rs 14,145 crore from Center till May; However, Pawar said, there is still Rs 15000 crore left!

महत्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात