अर्थव्यवस्था लागली वेगाने सावरू, गेल्या वर्षीच्या तुलनेत ३३ टक्के अधिक जीएसटी जमा


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – जुलैमध्ये वस्तू आणि सेवा करापोटी (जीएसटी) केंद्राकडे १.१६ लाख कोटी रुपये जमा झाले आहेत. २०२० मधील जुलै महिन्याच्या तुलनेत हे प्रमाण ३३ टक्क्यांनी जास्त आहे. अर्थव्यवस्था वेगाने सावरत असल्याचे हे निदर्शक असल्याचे अर्थमंत्रालयातर्फे सांगण्यात आले आहे. GST collection increased in July

जून २०२१ पूर्वी वस्तू आणि सेवा कराच्या वसुलीने सलग आठ महिने एक लाख कोटींचा टप्पा ओलांडला होता; मात्र मेमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने अनेक राज्यांत पूर्णत: किंवा अंशत: लॉकडाऊन लावण्यात आला होता. त्याचा फटका जीएसटीवसुलीला बसला; मात्र आता पुन्हा अर्थचक्र गतिमान होत आहे, असे अर्थमंत्रालयाने सांगितले आहे.



गेल्या वर्षी जुलैमध्ये ८७ हजार ४२२ कोटींचा जीएसटी जमा झाला होता. यावर्षी जून महिन्यातही एका लाखापेक्षा कमी ९२ हजार ८४९ कोटींचा जीएसटी जमा झाला होता. त्यात जुलै महिन्यात चांगलीच वाढ झाली आहे. यंदा जुलैमध्ये १ लाख १६ हजार ३९३ कोटींचा जीएसटी जमा झाला आहे. त्यात केंद्राचा २२ हजार १९७ कोटी, राज्याचा २८ हजार ५४१ कोटी, एकीकृत जीएसटी ५७ हजार ८६४ कोटी आणि उपकर ७,७९० कोटींचा समावेश आहे.

GST collection increased in July

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात