विशेष प्रतिनिधी
जम्मू – राजौरीत दहशतवाद्यांनी भाजपचे नेते जसबीर सिंग यांच्या घरावर ग्रेनेड हल्ले केले. जसबीर सिंग यांच्या घरावर तीन ग्रेनेड फेकण्यात आले. या हल्ल्यात तीन वर्षाचा पुतण्या वीर सिंग याचा मृत्यू झाला. काश्मी्र खोऱ्यात गेल्या दोन वर्षांपासून भाजप नेत्यांवर हल्ले होत आहेत.Grandee attack on BJP leader in Jammu
९ ऑगस्ट रोजी अनंतनाग येथे दहशतवाद्यांनी भाजपचे नेते गुलाम रसूल दार आणि त्यांच्या पत्नीची गोळी घालून हत्या करण्यात आली. गेल्यावर्षी जुलै महिन्यात भाजपचे नेते वासीम बारी यांची हत्या झाली. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात भाजप नेते अरिफ अहमद यांच्यावर हल्ला झाला.
६ ऑक्टोबर रोजी गंदरबल येथे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गुलाम कादीर यांची हत्या झाली. बडगाम येथेही भाजप कार्यकर्त्यावर हल्ला झाला होता.खांडली भागात राहणारे जसबीर सिंग यांच्यासह कुटुंबातील सात जण ग्रेनेड हल्ल्यात जखमी झाले. जसबीर सिंग हे कुटुंबीयांसह घरात असताना दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकले. एकामागून एक तीन ग्रेनेड फेकले आणि दहशतवादी अंधाराचा फायदा घेत पळून गेले.
ग्रेनेड स्फोटात जसबीर यांच्यासह अर्जुन सिंग, जसबीर सिंग यांची आई सिया देवी, भाऊ बलबीरसिंग, मुलगा कर्ण सिंग हे जखमी झाले. तीन वर्षाच्या वीरचा जीव वाचवता आला नाही. त्याला रात्री राजौरीतील वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले, परंतु त्याचा मृत्यू झाला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App