मेंदूचा शोध व बोध : 21 व्या शतकात अतिशय उच्च दर्जाची सॉफ्ट स्किल्स अंगी असणे आवश्यक


ज्यांचा बुद्‌ध्यांक उच्च आहे ते शैक्षणिकदृष्ट्या यशस्वी होण्याची शक्यशता असते. या लोकांना सामान्यपणे चांगल्या नोकऱ्या मिळतात व सर्वसाधारपणे त्यांचे आयुष्य यशस्वी म्हणता येईल. Must have very high quality soft skills in the 21st century

यशस्वी आयुष्यासाठी बुद्‌ध्यांक ही एकमेव गुरुकिल्ली मानली गेली; पण एखाद्या व्यक्ती ची जीवनातील आनंद लुटण्याची क्षमता किंवा अगदी वेगळ्या प्रकारची जीवन कौशल्ये वापरून यशस्वी होण्याची क्षमता, सुखीसमाधानी आयुष्य जगण्याची क्षमता याविषयी बुद्‌ध्यांक काहीही सांगत नाही.

आज 21 व्या शतकात भावनिक बुद्धिमत्ता आणि सुखसमाधान असलेले यशस्वी जीवन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. इतकेच नव्हे तर भावनिक बुद्धिमत्ता ही सुखी जीवनाची मोजपट्टी म्हणावी लागेल. बुद्‌ध्यांक आणि भावनिक बुद्धिमत्ता या जरी दोन वेगळ्या गोष्टी असल्या तरी बऱ्याचदा त्या ऐकमेकांना पूरक असतात. या दोघांच्या संयोजनाने कोणचेही आयुष्यातले यशापशय व सुख ठरविले जाते. ज्या कौशल्यांमध्ये आपल्याला डिग्री, डिप्लोमा किंवा प्रशस्तिपत्रके मिळतात. त्यांना हार्ड स्किल्स म्हणतात.

हार्ड स्किल्स अचूकपणे मोजता येतात. आपण पदवी किंवा इतर परीक्षेत मिळवलेले गुण याच प्रकारातले. हार्ड स्किल्सना आज बाजारात चांगली मागणी आहे. शैक्षणिक गुणवत्ता, एखादी गोष्ट प्रत्यक्ष करायला शिकणे यात अगदी नवशिक्या.पासून ते तज्ज्ञांपर्यंत स्तर उपलब्ध असतात. उदा. बॅंकिंग, आयटी, इंजिनिअरिंग इ. हार्ड स्किल्समध्ये प्रावीण्य मिळविण्याचे मार्ग त्यामानाने साधे, सरळ असतात. हार्ड स्किल्स शिकण्याच्या पद्धती बहुतांश साचेबंद असतात. तुमची सर्टिफिकेट्‌स, तुमच्या डिग्री, तुमचे त्या विषयातील प्रावीण्य सिद्ध करतात.

आज 21 व्या शतकात फक्ति हार्ड स्किल्स पुरेशी नाहीत, तर अतिशय उच्च दर्जाची सॉफ्ट स्किल्स मागितली जातात. उदा. इतरांशी मिळून मिसळून वागण्याची वृत्ती व क्षमता, परिणामकारक नेतृत्वशैली, इतर लोकांचा विकास व त्यांना नवीन शिकण्याची संधी देणे इत्यादी, स्वत:च्या क्षमता अधिक प्रगल्भ करणे, इतरांशी सुसंवाद व संभाषण कौशल्य, आपल्या विचारप्रणालीचा यथायोग्य उत्तम वापर, टीका किंवा अवघड प्रसंगातील सकारात्मक दृष्टिकोन. धोक्या्च्या काळात शांत व स्थिर राहणे, इतरांची मते आणि विचार समजावून घेण्याची क्षमता. वरील सर्व सॉफ्ट स्किल्स म्हणजेच भावनिक बुद्धिमत्ता होय.

Must have very high quality soft skills in the 21st century

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात