आशियातील कोरोना रुग्णसंख्या स्थिर तर अमेरिकेत तब्बल ३५ टक्के वाढ


विशेष प्रतिनिधी

जीनिव्हा – भारतात कोरोना संसर्गावर आलेले नियंत्रण आणि इंडोनेशिया, म्यानमारमध्ये कोरोना रुग्णांची सातत्याने घटती संख्या यामुळे अग्नेय आशियामध्ये संसर्गवाढ स्थिर राहिली असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. अग्नेय आशियाबाहेर, अमेरिकेत सर्वाधिक ३५ टक्के रुग्णवाढ नोंदविली गेली आहे. Corona patiants increased in USA

अग्नेय आशियामध्ये गेल्या आठवड्यात ७ लाख ९९ हजार नवे रुग्ण आढळले. त्याआधीच्या आठवड्याच्या तुलनेत रुग्णसंख्येत पाच टक्क्यांनी घट झाली आहे. भारतात रुग्णसंख्या स्थिर पातळीवर आहे. मात्र, श्रीलंका आणि थायलंडमध्ये अनुक्रमे २६ टक्के आणि २० टक्के रुग्णवाढ नोंदविली गेली आहे. अग्नेय आशियात सात आठवड्यांपासून सातत्याने कोरोना मृत्यूसंख्येत वाढ होत आहे.



गेल्या आठवड्यात मात्र प्रथमच हे प्रमाण घटल्याचे आढळून आले आहे. मालदीव आणि म्यानमारमधील मृत्यूदर घटल्याने ही घट दिसून येत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या साप्ताहिक अहवालात म्हटले आहे.

Corona patiants increased in USA

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात