विशेष प्रतिनिधी
भुवनेश्वर : कोरोनाबाधित व्यक्तीपर्यंत रुग्णवाहिका लवकरात लवकर पोचावी यासाठी जीपीएस यंत्रणेची मदत घेतली जात आहे. रुग्णवाहिकांत जीपीएस बसवल्यामुळे रुग्णांना दवाखान्यात लवकर पोचणे शक्य होऊ शकते.GPS system to ambulance in Orissa
भुवनेश्वर शहरातील कोविड व्यवस्थापन कार्यक्रमातंर्गत ६४ रुग्णवाहिका सध्या रुग्णांच्या सेवेत तैनात आहेत. पैकी ४० रुग्णवाहिकेत अगोदरपासूनच जीपीएस सक्रिय आहे. उर्वरित रुग्णवाहिकेत लवकरच ही यंत्रणा बसवली जाईल,
असे भुवनेश्वर महानगर पालिका (बीएमसी) च्या अधिकाऱ्याने सांगितले.ओडिशात बाधितांची संख्या ५,८८,६८७ वर पोचली आहे. तसेच एकूण मृतांची संख्या २२७३ वर पोचली आहे.
डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल (डीसीएच) आणि कोविड केअर सेंटर (सीसीसी) मध्ये रुग्णांना तत्काळ दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकांवर जीपीएसच्या मदतीने देखरेख सुरू करण्यात आली आहे.
बीएमसीच्या कोविड हेल्पलाइन क्रमांक १९२९ वर फोन केल्यानंतर रुग्णाला डीसीएच किंवा सीसीसी येथे दाखल करण्याचा सल्ला दिला जातो. यानुसार बीएमसीकडून दोन्ही पैकी एका ठिकाणी बेड राखीव ठेवण्यात येतो.
त्यानंतर रुग्णवाहिकेला संबंधित रुग्णाच्या घरी जाण्यास सूचना दिली जाते. या रुग्णवाहिकेत जीपीएस तंत्र असून रुग्णाच्या घरी जाण्यापर्यंतचा कालावधी समजण्यास मदत मिळते आणि तांत्रिक अडचण आल्यास ती सोडवण्यास मदत मिळते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App