विशेष प्रतिनिधी
दिल्ली : सामाजिक कार्य करण्याच्या दृष्टीने गुगल कंपणीने जगातील 19 देशातील एकूण 34 संस्थाना अनुदान देण्याचे ठरवले आहे. यामध्ये भारतातील 3 संस्थांचा समावेश आहे. संहिता-CGF, प्रथम एज्युकेशन फाउंडेशन, स्वतालिम फाउंडेशन या संस्थांचा समावेश आहे. या तिन्ही संस्थांना मिळून एकूण 18.5 कोटी रुपयांचे अनुदान गुगल कंपनीच्या वतीने मिळणार आहे.
Google provides grants to 3 organizations in India for women empowerment
एकूण 7800 अर्जांमधून या तीन संस्थांची निवड करण्यात आली आहे. कौशल्य विकास आणि करिअर उन्नती, उद्योजकता आणि व्यवसाय, शिक्षण, आर्थिक स्वातंत्र्य आणि समर्थ या चार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संस्थांनी हे अनुदान प्राप्त होण्यासाठी अर्ज दाखल केले होते.
संहिता सीजीएफ या संस्थेच्यावतीने ‘रिव्हाइव्ह अलायन्स’ प्रकल्पांद्वारे एकूण 10000 महिलांना व्याजमुक्त रिटरनेबल कर्ज देण्याची योजना करण्यात आली आहे. ज्या महिला अनुदानाची परतफेड करतील त्यांना सीजीएफच्या बँकिंग आणि मायक्रोफायनान्स भागीदारीमध्ये प्रवेश मिळणार आहे.
गुंतवणूक : Google Pay वर लवकरच मिळणार FD करण्याची सुविधा, एवढे असे वार्षिक व्याज
प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनद्वारे 7000 हून अधिक ग्रामीण बेरोजगार महिलांना सौंदर्य आणि आरोग्य उद्योग तसेच पुरुषप्रधान ऑटोमोटिव्ह, यांत्रिक, इलेक्ट्रिकल उद्योगांमध्ये नोकऱ्यांची संधी उपलब्ध करून देण्यासाठी अनुदान मिळणार आहे.
प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन द्वारे महिलांना तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यावर भर दिला जाणार आहे. नॅशनल इंडियन नॅशनल स्कूल ऑफ डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनद्वारे त्यांना तांत्रिक शिक्षण दिले जाणार आहे. सुमारे 300 ते 500 तास इतक्या मोठ्या काळासाठी हे तांत्रिक शिक्षण देऊन त्यांना त्यामध्ये एक्स्पर्ट बनवण्याचा निर्धार प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन द्वारे केला गेला आहे.
तर स्वटालिम फाऊंडेशनद्वारे ग्रामीण भारतातील ऐतिहासिकदृष्ट्या उपेक्षित मुली आणि महिलांना तंत्रज्ञान प्रशिक्षण देण्याचा निर्धार केला आहे. मुलींना गणित आणि विज्ञान यांसारख्या पारंपरिक विषयांमध्ये पारंगत करण्यासाठी तसेच बँक खाते कसे उघडायचे, सामाजिक व भावनिक, आर्थिक साक्षरता या बाबत प्रशिक्षणबप्रदान करण्यासाठी इंटरनेट ची अपुऱ्या सेवा असलेल्या ठिकाणी हा प्रकल्प राबवला जाणार आहे.
लॉक डाऊनमुळे बऱ्याच ठिकाणी इंटरनेटची व्यवस्था उपलब्ध होऊ शकली नव्हती. अशा भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी हा प्रोग्राम तयार करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ज्या भागामध्ये बालविवाहाचे प्रमाण जास्त आहे, तेथे मुलींमध्ये जागरुकता निर्माण करणे. हा या प्रोग्रामद्वारे हेतू साध्य केला जाणार आहे. पुढील दोन वर्षांमध्ये आणखी 5000 मुलींपर्यंत हा अजेंडा पोहोचवण्याचे उद्दिष्ट या प्रोग्रामद्वारे आखले गेले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App